मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena on Modi : ही मजा फक्त मोदीच करू शकतात; शिवसेनेची बोचरी टीका

Shiv Sena on Modi : ही मजा फक्त मोदीच करू शकतात; शिवसेनेची बोचरी टीका

Feb 13, 2023, 10:27 AM IST

  • Shiv Sena slams Narendra Modi : एकटाच सगळ्यांना भारी पडतोय या पंतप्रधान मोदींच्या विधानावर शिवसेनेनं अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे.

Modi-Koshyari

Shiv Sena slams Narendra Modi : एकटाच सगळ्यांना भारी पडतोय या पंतप्रधान मोदींच्या विधानावर शिवसेनेनं अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे.

  • Shiv Sena slams Narendra Modi : एकटाच सगळ्यांना भारी पडतोय या पंतप्रधान मोदींच्या विधानावर शिवसेनेनं अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे.

Shiv Sena slams Narendra Modi : हाती पोलीस, न्यायालय, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज ठेवून 'मी एकटाच लढत आहे व सगळ्यांना भारी पडत आहे' असं सांगणं मजेशीर आहे व ही मजा फक्त मोदीच करू शकतात. अशी मजा आपल्या देशात गेली सात-आठ वर्षे सुरू आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

'सामना'च्या आजच्या अग्रलेखात भगतसिंह कोश्यारी यांची गच्छंती व आंध्र प्रदेशचे नवे राज्यपाल अब्दुल नझीर यांच्या नियुक्तीवर भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडंच राज्यसभेत भाषण करताना आपण एकटेच सर्वांना भारी पडलो आहोत, असं स्वत:च सांगितलं होतं. नव्या राज्यपालांच्या नियुक्तीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोदींच्या या विधानातील विरोधाभास उलगडून दाखवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांची नियुक्ती आंध्र प्रदेशच्या राज्यपाल पदी करण्यात आली आहे. याच निमित्तानं माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई, गौरी व्हिक्टोरिया या सर्वांची पार्श्वभूमी व त्यांनी दिलेल्या निकालाकडं शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे. छुप्या हातमिळवणीशिवाय अशा नियुक्त्या होत नाहीत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

आपण एकटेच सर्व विरोधकांना कसे भारी पडलो आहोत हे पंतप्रधान मोदी यांनी भर संसदेत छातीवर मूठ आपटून सांगितलं. असं छाती पिटून बोलणं पंतप्रधानपदास शोभत नाही आणि त्याचं ते म्हणणं खरंही नाही. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणं ही काही मर्दुमकी नाही. राज्यघटनेची व तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती, असा संताप अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे.

…तर जनता राजभवनात घुसली असती!

कोश्यारी यांच्या गच्छंतीवरही शिवसेनेनं भाष्य केलं आहे. 'महाराष्ट्रातून भगतसिंह कोश्यारी यांना अखेर जावं लागलं. त्यांना घालवलं नसतं तर जनता एक दिवस राजभवनातच घुसली असती, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या