मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bharat Gogawale : भारत गोगावलेंना बाप्पा पावणार?, मंत्रीपदावर सूचक वक्तव्य, म्हणाले...

Bharat Gogawale : भारत गोगावलेंना बाप्पा पावणार?, मंत्रीपदावर सूचक वक्तव्य, म्हणाले...

Sep 27, 2023, 10:48 AM IST

    • Bharat Gogawale : महाडचे आमदार भारत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणरायाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी कॅबिनेट विस्तारावर भाष्य केलंय.
Bharat Gogawale In Mumbai (HT)

Bharat Gogawale : महाडचे आमदार भारत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणरायाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी कॅबिनेट विस्तारावर भाष्य केलंय.

    • Bharat Gogawale : महाडचे आमदार भारत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणरायाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी कॅबिनेट विस्तारावर भाष्य केलंय.

Bharat Gogawale In Mumbai : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आणि भारत गोगावले हे नाराज असल्याची चर्चा आहे. दोन्ही आमदारांनी मंत्रीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. परंतु दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी १० आमदार मंत्री झाले. राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्री झाले. परंतु गोगावलेंना मंत्रीपदाची संधी कधी मिळणार?, असा सवाल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यातच आता भारत गोगावलेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मंत्रीपदावर भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

मुंबईत बोलताना आमदार भारत गोगावले म्हणाले की, मंत्री होण्याची इच्छा आपल्याला आहे, मला मंत्री व्हायचंय हे बाप्पाला माहिती आहे. त्यामुळं ते लवकरच होणार असल्याचं सांगत भारत गोगावले यांनी पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य केलं आहे. याशिवाय योग्य वेळ आल्यास भारत गोगावले मंत्री होणारच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता मंत्रीपदावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट विस्तारावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील मुंबईसह दिल्लीत मंत्रीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईवर बोलताना भारत गोगावले म्हणाले की, आमची बाजू सकारात्मक आहे, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाहीय. नियमाप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष निकाल देणार आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांना काळजी करावी लागणार असल्याचं सांगत भारत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टोला हाणला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे समर्थक आमदार सत्तेत सहभागी झाल्याने भाजपसह शिंदे गटातील काही जेष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता भारत गोगावले आणि संजय शिरसाट यांना मंत्रीपदासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

पुढील बातम्या