मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Supply : पुणेकरांना मोठा दिलासा, पुणे शहरातील पाणीकपात अखेर रद्द, पालकमंत्र्यांची घोषणा

Pune Water Supply : पुणेकरांना मोठा दिलासा, पुणे शहरातील पाणीकपात अखेर रद्द, पालकमंत्र्यांची घोषणा

Jul 30, 2023, 09:15 AM IST

    • Pune Water Supply : धरणांमधील पाणीसाठी कमी झाल्यामुळं महापालिकेने पुणे शहरात पाणीकपात लागू केली होती.
Pune Water Supply News Live Updates (HT)

Pune Water Supply : धरणांमधील पाणीसाठी कमी झाल्यामुळं महापालिकेने पुणे शहरात पाणीकपात लागू केली होती.

    • Pune Water Supply : धरणांमधील पाणीसाठी कमी झाल्यामुळं महापालिकेने पुणे शहरात पाणीकपात लागू केली होती.

Pune Water Supply News Today : पुण्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असेलली पाणीकपात अखेर रद्द करण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पाणीकपात रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने पुण्यात पाणीकपात लागू करण्यात आली होती. आठवड्यातून दर गुरुवारी पुण्यात पाणीकपात सुरू होती. अखेर आता पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धरणांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळं पुणे शहरातील पाणीकपात रद्द करण्याची घोषणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याचे ३१ ऑगस्टपर्यंत योग्य नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिले होते. त्यापूर्वीच जुलै महिन्यात पुणे शहर तसेच उपनगरांच्या भागात जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला, पानशेत आणि अन्य धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं पाणीकपात रद्द करण्याची मागणी पुणेकरांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता धरणांतील पाणीसाठा वाढत असल्याने राज्य सरकारने पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरासाठी आवश्यक पाणीपुवरठा कायम ठेवून शेती आणि तलावांसाठी पुरेसे पाणी देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिल्या आहे. याशिवाय दर दोन महिन्यांनी धरणांतील पाणीसाठ्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली जाणार आहे. येत्या गुरुवारपासून पुणे शहरात पाणीकपातीचा नवा नियम लागू केला जाणार आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळंच आम्ही पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी येत्या गुरुवारपासून होणार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

पुढील बातम्या