मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : 'आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल', शरद पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar : 'आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल', शरद पवारांचं सूचक विधान

Jul 30, 2023, 11:29 PM IST

  • Sharad pawar : मी, उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी केलं आहे. 

Sharad pawar

Sharad pawar : मी,उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात आम्ही तिघांनी ठरवलं तरमहाराष्ट्रात बदल होईल, असं विधानराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

  • Sharad pawar : मी, उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी केलं आहे. 

मुंबई : मी, उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केलं आहे. वाय बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना पवारांनी हे विधान केले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

वाय बी. चव्हाण सेंटरमध्ये वि. का. राजवाडे संशोधन मंडळ ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीच्या तीनही नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी भविष्यातल्या राजकारणाबाबत सूचक विधान केलं आहे.


या कार्यक्रमा बोलताना शरद पवारांनी महाविकास आघाडीला बळ देणारं विधान केलं आहे. तसंच पुढच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचे संकेतही पवारांनी दिले आहेत. आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये बदल होईल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे. मधल्या काळात या संस्थांना ५ कोटींची देणगी मी दिली होती, आता ५० लाखांचं अनुदान जाहीर करतो, अशी घोषणाही शरद पवारांनी केली आहे.

 

शरद पवार म्हणाले, राज्य सरकारशी बोलणे सध्या जरा अडचणीचे आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघाला की, राज्य सरकारला मदत करणे भाग पडेल. राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्था आणि त्यांच्याकडील खजिना जतन केला पाहिजे. त्यासाठी सरकारने या संस्थांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. तसेच, अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आहे. काही पुस्तक वाचली. काही पुस्तकं चाळली. ही पुस्तकं अभ्यासपूर्ण लिहिली गेलेली आहेत, असे शरद पवार म्हणाले.

पुढील बातम्या