मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad pawar : भाजपाच्या ‘मिशन बारामती’अन् निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर पवारांचा खोचक टोला!

Sharad pawar : भाजपाच्या ‘मिशन बारामती’अन् निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर पवारांचा खोचक टोला!

Sep 15, 2022, 06:40 PM IST

    • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या मिशन बारामतीवर खोचक टोला लगावला आहे. त्याचबरोबर पवारांनी निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावरून मिश्किल टिप्पणी केली आहे.
निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावरपवारांचा खोचक टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या मिशन बारामतीवर खोचक टोला लगावला आहे.त्याचबरोबर पवारांनीनिर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावरून मिश्किल टिप्पणी केली आहे.

    • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या मिशन बारामतीवर खोचक टोला लगावला आहे. त्याचबरोबर पवारांनी निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावरून मिश्किल टिप्पणी केली आहे.

भाजपने आतापासूनच २०२४ ची तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील १६ मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना सोपवली आहे. यामध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. बारामतीची जाबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडे सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून बारामती व इंदापूरमध्ये कार्यकर्ता बैठक घेऊन दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यादरम्यान भाजपाच्या ‘मिशन बारामती’ ची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, २०२४ मध्ये बारामतीचा खासदार भाजपचा असेल. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

बारामती महाराष्ट्रातच येते, भाजपाचं महाराष्ट्रासाठी मिशन आहे, तसेच अमेठीत राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो तर बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव काही मोठी गोष्ट नाही,  असं म्हणत भाजप नेत्याकडून बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. हा सगळा कलगीतुरा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरून भाजपला खोचक टोला लगावला आहे.त्याचबरोबर पवारांनीनिर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावरून मिश्किल टिप्पणी केली आहे.

पुण्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी (Sharad pawar) भाजपाच्या मिशन बारामती संदर्भात उपहासात्मक टिप्पणी केली. बारामतीत येणं हा त्यांचा अधिकार आहे. सगळ्या राजकीय पक्षांना जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते करावं. त्याबद्दल काही तक्रार नाही,असं शरद पवार म्हणाले.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येत असल्याबाबत विचारताच ते म्हणाले, केंद्रीय मंत्री येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. निर्मला सीतारमण येतील,त्यांच्या जनतेशी संवाद साधतील. बारामतीत येऊन, पुरंदरमध्ये येऊन, शिरूरमध्ये येऊन आपले विचार सांगतील. त्या सगळ्या भागातल्या जनतेला त्यांचे विचार, त्यांची भाषा सहजपणे समजेल”, अशा सूचक शब्दांत शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली.

या पत्रकार परिषदेत पवारांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकारणावर देखील पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टीका करा,पण रोजच करू नका. एक दिवस-दोन दिवस ठीक आहे. किती दिवस? नवीन प्रकल्प कसे येतील, यावर लक्ष केंद्रीत करा, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही कान टोचले.

पुढील बातम्या