मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pawar-Ambedkar Meet : शरद पवार- प्रकाश आंबेडकरांची भेट; ‘वंचित’ महाविकास आघाडीत होणार सामील?

Pawar-Ambedkar Meet : शरद पवार- प्रकाश आंबेडकरांची भेट; ‘वंचित’ महाविकास आघाडीत होणार सामील?

Apr 23, 2023, 08:25 PM IST

  • Sharad pawar and Prakash Ambedkar meet : मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. आंबेडकर आणि पवार यांची भेट झाल्याने वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची भेट

SharadpawarandPrakashAmbedkarmeet : मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. आंबेडकर आणि पवार यांची भेट झाल्याने वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • Sharad pawar and Prakash Ambedkar meet : मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. आंबेडकर आणि पवार यांची भेट झाल्याने वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Maharashtra Politics : राज्यातील शिंदे फडणवीस सरकार पुढील १५ दिवसात कोसळणार, अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच अजित पवार यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे म्हटलं आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत भेट झाल्याचे बोलले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chembur degree college bans hijab: चेंबूरमध्ये महाविद्यालयाकडून हिजाब, बुरखा, नकाब घालण्यावर बंदी!

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. राज्याच्या राजकारणात लवकरच दोन मोठे राजकीय भूकंप होणार असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यानंतर आता शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आंबेडकर आणि पवार यांची भेट झाल्याने वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाल्यास याचा महाआघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीत प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली होती व त्यावेळी दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती करत असल्याचे म्हटले होते. त्यावेळी वंचितने केवळ शिवसेनेशी युती करण्यापेक्षा महाआघाडीत सामील झाल्यास याचा महाआघाडीला फायदा होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

आता पुन्हा एकदा शरद पवार यांची प्रकाश आंबडेकर यांची भेट घेतल्यामुळे मविआमध्ये वंचितचा समावेश होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

पुढील बातम्या