मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  shanishingnapur temple: शनिशिंगणापूर देवस्थान संस्थेचे विशेष ऑडिट करणार; देवेंद्र फडणवीस यांची विधानपरीक्षेत घोषणा

shanishingnapur temple: शनिशिंगणापूर देवस्थान संस्थेचे विशेष ऑडिट करणार; देवेंद्र फडणवीस यांची विधानपरीक्षेत घोषणा

Dec 20, 2023, 01:31 PM IST

    • shanishingnapur temple audit : शनिशिंगणापूर देवस्थानला मागच्या दहा वर्षांमध्ये जेवढे काही दान आले आहे आणि त्याचा खर्च कुठे झाला याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिट करणार असल्याचे जाहीर केले.
shanishingnapur

shanishingnapur temple audit : शनिशिंगणापूर देवस्थानला मागच्या दहा वर्षांमध्ये जेवढे काही दान आले आहे आणि त्याचा खर्च कुठे झाला याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिट करणार असल्याचे जाहीर केले.

    • shanishingnapur temple audit : शनिशिंगणापूर देवस्थानला मागच्या दहा वर्षांमध्ये जेवढे काही दान आले आहे आणि त्याचा खर्च कुठे झाला याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिट करणार असल्याचे जाहीर केले.

shanishingnapur temple audit : श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर संस्थानात गैरप्रकार होत असल्याचे आढळले असून या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी प्रश्न विचारल्यावर उत्तर देतांना शनि शिंगणापुर देवस्थान ट्रस्टचे विशेष ऑडिट करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं आरोप होत होते.

ट्रेंडिंग न्यूज

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले जत होते. हा प्रश्न विधान सभेत देखील उपस्थित झाला. चांदशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. आमदार अनिल परब, कपिल पाटील, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, प्रसाद लाड आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.

चहा बनवायला उशीर झाला म्हणून बायकोचा तलवारीनं वार करून खून

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट करत देवस्थानाची चौकशी आणि ऑडिट करण्याचे आदेश दिले आहे. या साठी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. यानंतर कार्यवाही करण्यात येईल असे फडणीवस सभागृहात म्हणाले. श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम २०१८ या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा दिनांक निश्चित करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे देखील ते म्हणाले.

Madhya Pradesh : मध्य प्रदेश विधानसभेतून नेहरूंचं चित्र हटवले; भाजपचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट देखील केले आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये, जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता, असे लिहीत श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर संस्थानचे विशेष ऑडिट करण्यात येईल. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करण्यात येईल आणि २ महिन्यात अहवाल घेण्यात येईल. यापूर्वी सहायक धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या चौकशी अहवालात विसंगती आहेत. त्यामुळे ही चौकशी आवश्यक आहे, असे लिहिले आहे.

फडणवीस म्हणाले, शनैश्वर देवस्थानच्या संदर्भातील सदस्यांनी मांडलेले विषय गंभीर असून गरज नसतांना १८०० जणांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच देवस्थानमध्ये कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली नाही. देणगी गोळा करण्यातही तक्रारी असून देवस्थानचे विशेष लेखापरीक्षणनंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या