मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shailesh Tilak : भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं शैलेश टिळक भावूक, म्हणाले...

Shailesh Tilak : भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं शैलेश टिळक भावूक, म्हणाले...

Feb 04, 2023, 05:43 PM IST

  • Shailesh Tilak on not getting BJP ticket : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

shailesh tilak (HT)

Shailesh Tilak on not getting BJP ticket : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

  • Shailesh Tilak on not getting BJP ticket : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Shailesh Tilak on not getting BJP ticket in Pune Kasba Peth Bypoll : भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंधात येत्या २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपनं पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील टिळकवाड्यात जाऊन शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उमेदवारी न मिळाल्यामुळं अन्याय झाल्याचं सांगतानाच शैलेश टिळक यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यामुळं आता निवडणुकीत टिळक कुटुंबियांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शैलेश टिळक माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा असल्यानं आम्ही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु आम्हाला तिकीट देण्यात आलेलं नाही. त्याचं कारण काय आहे, हे आम्हाला माहिती नाहीये. मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाल्याचं सांगताच शैलेश टिळकांचा कंठ दाटून आला. उमेदवारी मिळाली नसली तरी आम्ही पक्षासोबतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गेल्या २० वर्षांपासून मुक्ता टिळक या मतदारसंघात काम करत होत्या. त्यांनी अनेक पदांवर काम केलं. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल, अशी आशा आम्हाला होती. परंतु ते होऊ शकलेलं नाही. परंतु आता पक्षानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही भाजपचं काम करणार असल्याचं शैलेश टिळक म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीला सव्वा वर्षाचा काळ उरलेला असताना ताईंचं उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी टिळक कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी देण्याची मागणी आम्ही भाजपकडे केली होती. भाजपनं वेगळा निर्णय घेतला असला तरी तो आम्हाला मान्य असल्याचं सांगत शैलेश टिळक यांनी भाजपच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

पुढील बातम्या