मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC : खेळाडू असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर, दोन नायब तहसीलदारांनी निवड आयोगाकडून रद्द

MPSC : खेळाडू असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर, दोन नायब तहसीलदारांनी निवड आयोगाकडून रद्द

May 29, 2023, 11:13 PM IST

  • mpsc exam : नायब तहसिलदार पदावर निवड झालेल्या दोन नायब तहसिलदारांची निवड एमपीएससीने रद्द ठरवली आहे.

mpsc

mpsc exam : नायब तहसिलदार पदावर निवड झालेल्या दोन नायब तहसिलदारांची निवड एमपीएससीने रद्द ठरवली आहे.

  • mpsc exam : नायब तहसिलदार पदावर निवड झालेल्या दोन नायब तहसिलदारांची निवड एमपीएससीने रद्द ठरवली आहे.

मुंबई - खेळाडू असल्याचा दावा करत खोटे प्रमाणपत्र सादर करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून नायब तहसिलदार पदावर निवड झालेल्या दोन नायब तहसिलदारांची निवड एमपीएससीने रद्द ठरवली आहे. अनिल बाबुराव पाटील आणि जयश्री गोविंद नाईक असं या दोघांची नावं आहेत. एमपीएससीने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

थरकाप उडवणाऱ्या पुण्यातील कार Porsche Car अपघाताचा VIDEO व्हायरल; पाहून अंगावर काटा येईल

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

अनिल बाबुराव पाटील आणि जयश्री गोविंद नाईक या दोघांनी परीक्षेसाठी पात्र खेळाडू असल्याचा दावा करत खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून पदं घेतली होती. २०१९ मध्ये राज्यसेवा आयोगाच्या यादीत या दोघांचीही नावं होती. आता त्यांचा दावा खोटा असल्याचं समोर आल्यानंतर एमपीएससीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीने ट्वीट करत म्हटलं आहे की, आयोगाची फसवणूक केल्याबद्दल या दोघांचीही निवड रद्द केल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये इतर आरक्षणासोबत खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षणदेण्यात येतं.

 

आयोगाने म्हटलं आहे की, राज्यसेवा परीक्षा २०१९ मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करुन आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या