मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Flood: कोल्हापुरात पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन २८ गावांतील शाळा बंद

Kolhapur Flood: कोल्हापुरात पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन २८ गावांतील शाळा बंद

Jul 25, 2023, 04:59 PM IST

  • Kolhapur 28 village schools closed: कोल्हापुरात पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने २८ गावातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Kolhapur Flood

Kolhapur 28 village schools closed: कोल्हापुरात पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने २८ गावातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Kolhapur 28 village schools closed: कोल्हापुरात पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने २८ गावातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Kolhapur Flood Updates: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले असून, वाहतूक बंद झाली आहे. नदी, नाल्यांमध्ये पूर आल्याने जनजवीन विस्कळीत झाले. पंचगंगा नदीने इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन २८ गावातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्क करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने राबवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पहिल्या टप्प्यात येणाऱ्या २८ गावातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अनेक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबईसोबतच ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरातही पावसाचा जोर या आठवड्यात कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली.

पुढील पाच दिवस महत्त्वाचे

कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात घाट विभागात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या