मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje: शिवरायांच्या अवमानामुळं उदयनराजेंचा राग अनावर; तलवारीनं मुंडकी छाटण्याची भाषा

Udayanraje: शिवरायांच्या अवमानामुळं उदयनराजेंचा राग अनावर; तलवारीनं मुंडकी छाटण्याची भाषा

Dec 02, 2022, 06:35 PM IST

  • Udayanraje Bhosale: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारंवार होत असलेल्या अपमानामुळं उदयनराजे भोसले प्रचंड नाराज असून त्यांनी आज थेट मुंडकी छाटण्याची भाषा केली.

Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारंवार होत असलेल्या अपमानामुळं उदयनराजे भोसले प्रचंड नाराज असून त्यांनी आज थेट मुंडकी छाटण्याची भाषा केली.

  • Udayanraje Bhosale: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारंवार होत असलेल्या अपमानामुळं उदयनराजे भोसले प्रचंड नाराज असून त्यांनी आज थेट मुंडकी छाटण्याची भाषा केली.

Udayanraje Bhosale: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राजकीय नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या वक्तव्यामुळं महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले आहेत. त्यांनी केली असून रायगडावर जनआक्रोश आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला. 'माझ्या मनात इतका संताप आहे की एकेकाची मुंडकी छाटावीशी वाटतात, असं ते म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात अस्वस्थता आहे. राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कोश्यारी, त्रिवेदी व लोढा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मात्र, भाजपनं त्यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं उदयनराजे संतापले आहेत. कोश्यारीची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रायगडावर उद्या ते जनआक्रोश आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वी, आज साताऱ्यात जलमंदिर पॅलेस इथं उदयनराजे यांची शिवप्रेमी संघटना व कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर आंदोलनसाठी निघताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

‘तलवार घेऊन एकेकाची मुंडकी छाटून टाकावी असं वाटतंय. तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्हाला संताप येणार नाही का? शिवाजी महाराज नसते तर आपले आईबापही नसते, असं उदयनराजे म्हणाले. 'जनआक्रोश आंदोलन हे कोणा विशिष्ट व्यक्ती किंवा पक्षाच्या विरोधात नाही. वारंवार या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा व महापुरुषांचा अपमान होतोय, त्या विरोधात कोणीतरी आवाज उठवला पाहिजे असं वाटतं. कोणीतरी म्हणताना मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही. मी या घराण्याचा वारसा सांगतो आणि मी शिवभक्त आहे. मी आवाज नाही उठवला तर या वाड्यात राहण्याचा मला नैतिक अधिकार नाही. माझ्या नावापुढं राजे लावण्याचा मला अधिकार नाही, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

पुढील बातम्या