मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे अडचणीत.. ‘या’ प्रकरणात उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे अडचणीत.. ‘या’ प्रकरणात उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार

Jun 21, 2023, 11:35 PM IST

  • Udayan raje :बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udayan raje

Udayan raje :बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Udayan raje :बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा बाजार समिती नूतन इमारत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकसनाचे काम करु न देणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापती विक्रम पवार यांनी खासदार उदयनराजेंसह सुमारे ४५ कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दिली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai Pune weather update : मुंबईत उकाड्याने तर, ऊन आणि पावसाच्या खेळानं पुणेकर हैराण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी बुधवारी रात्री तक्रार दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी मुरलीधर भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसळ, सतीश माने, अर्चना देशमुख, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, रंजना रावत, किशोर शिंदे, कुणाल चव्हाण, नंदकुमार नलवडे, रोहित लाड, युनूस जेंडे, अनिल पिसाळ, काशिनाथ गोरड, संपत महादेव जाधव, शेखर चव्हाण, गितांजली कदम, अश्विनी संतोष गुरव, साैरभ संजीव सुपेकर, प्रवीण धसके, सुनील काटकर, संदेश कुंजीर, सागर गणपत जाधव यांच्यासह इतर १० ते १५ जणांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे.

सातारा शहरातील खिंडवाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीचे भूमीपूजन शिवेंद्रराजे यांच्या हस्ते होणार होतं. परंतु कार्यक्रमापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी समर्थकांसह कार्यक्रमास्थळी हजेरी लावत कार्यक्रम उधळून लावला होता.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते बुधवारी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार होतं, परंतु अचानक कार्यक्रमस्थळी खासदार उदयनराजे यांनी समर्थकांसह हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी अचानक कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी करत तोडफोड करण्यास सुरुवात केली.

कार्यक्रमस्थळी उदयनराजेंच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याची माहिती समजताच शिवेंद्रराजेंनी घटनास्थळी येणं टाळलं. त्यामुळं आता सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या