मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: मोठी बातमी! लवकरच संजय राऊत ठाकरे गट सोडणार, नितेश राणेंनी तारीखही सांगितली

Sanjay Raut: मोठी बातमी! लवकरच संजय राऊत ठाकरे गट सोडणार, नितेश राणेंनी तारीखही सांगितली

May 07, 2023, 12:35 PM IST

  • Nitesh Rane On Sanjay Raut: भाजप आमदार नितेश यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे.

Nilesh Rane (PTI)

Nitesh Rane On Sanjay Raut: भाजप आमदार नितेश यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे.

  • Nitesh Rane On Sanjay Raut: भाजप आमदार नितेश यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे.

Sanjay Raut Will Joins NCP: महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या दोन तीन आठवड्यात मोठा भूकंप येणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे विश्वासू नेते आणि खासदार संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणा यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी किंवा १० जूनपूर्वीच संजय राऊत ठाकरे गट सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणा म्हणाले की, संजय राऊतांनी कळवलं होतं की, आता उद्धव ठाकरेंचे काही खरे नाही. त्यांच्याकडे पक्ष राहिला नाही. मला ते पुन्हा खासदार करु शकत नाही. यामुळे त्यांच्यासोबत राहण्यास रस नाही. ज्या दिवशी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला, त्याच दिवशी संजय राऊतांना शरद पवारांसोबत व्यासपीठावर बसायचे होते. यासाठी संजय राऊत शरद पवारांना सकाळपासून फोन करत होते. परंतु, शरद पवारांनी त्यांचा फोन उचलला नाही. यामुळे संजय राऊत शरद पवारांच्या निवासस्थानी गेले होते. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अट घातली. ती म्हणजे, अजित पवार यांनी पक्ष सोडला तर मी लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतो. त्यामुळे संजय राऊत हे सातत्याने अजित पवार यांना लक्ष्य करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.

नितेश राणेंच्या वक्तव्यावर अद्याप संजय राऊतांची कोणताही प्रतिक्रिया आली नाही. यावर ते काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्याकडे पक्षाचे सर्वात विश्वासू नेते म्हणून पाहिले जाते. त्यांनी याआधीही अनेकदा शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाच्या विस्तारात संजय राऊतांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, नितेश राणेंच्या दाव्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य वेधून घेतले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या