मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay raut : वाघ बाहेर आलाय; शिंदे-फडणवीस सावध रहा! शिवसैनिकांचा कोल्हापुरात जल्लोष

Sanjay raut : वाघ बाहेर आलाय; शिंदे-फडणवीस सावध रहा! शिवसैनिकांचा कोल्हापुरात जल्लोष

Nov 09, 2022, 04:23 PM IST

    • शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. कोल्हापूरमध्येही शिवसैनिकांनी वाघ बाहेर आलाय, शिवसेनाचा ढाण्या वाघ अशी घोषणाबाजी करत जल्लोष केला.
शिवसैनिकांचा कोल्हापुरात जल्लोष

शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. कोल्हापूरमध्येही शिवसैनिकांनी वाघ बाहेर आलाय, शिवसेनाचा ढाण्या वाघ अशी घोषणाबाजी करत जल्लोष केला.

    • शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. कोल्हापूरमध्येही शिवसैनिकांनी वाघ बाहेर आलाय, शिवसेनाचा ढाण्या वाघ अशी घोषणाबाजी करत जल्लोष केला.

Sanjay Raut Bail PMLA court : शिवसेना नेते खासदार संजय राऊत तब्बल १०१ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर येत आहेत. पत्राचाळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळताच राज्यातील शिवसैनिकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. टायगर इज बॅक, शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर येणार, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत. कोल्हापूर शिवसैनिकांकडूनही संजय राऊत यांच्या सुटकेचा जल्लोष करण्यात येत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

कोल्हापुरात शिवसैनिकांनी मिठाई वाटप करत जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर आला, अशी प्रतिक्रिया दिली. विजय देवणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे, सुषमा अंधारे यांनी तुम्हाला सळो की पळो करून सोडलं आहे, आता वाघ तुम्हाला सोडणार नाही. 

शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर हेतूपरस्पर कारवाई करण्यात आली. जे देशभरात घडत आहे ते महाराष्ट्रात घडत आहे. न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला आहे. हा हुकूमशाहीला धक्का आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या