मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Highway Accident : समृद्धी हायवेवर भीषण अपघात! शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला प्राण्याची धडक; ७ गंभीर

Samruddhi Highway Accident : समृद्धी हायवेवर भीषण अपघात! शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला प्राण्याची धडक; ७ गंभीर

Dec 27, 2023, 10:02 AM IST

  • Samruddhi Mahamarg Accident near Washim : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. येथील अपघात कमी व्हावे या साठी करण्यात आलेल्या उपाय योजना देखील फोल ठरल्या आहेत. साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या  भाविकांच्या गाडीला वन्यप्राणी धडकल्याने अपघात झाला आहे.

samruddhi mahamarg accident near washim

Samruddhi Mahamarg Accident near Washim : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. येथील अपघात कमी व्हावे या साठी करण्यात आलेल्या उपाय योजना देखील फोल ठरल्या आहेत. साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला वन्यप्राणी धडकल्याने अपघात झाला आहे.

  • Samruddhi Mahamarg Accident near Washim : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. येथील अपघात कमी व्हावे या साठी करण्यात आलेल्या उपाय योजना देखील फोल ठरल्या आहेत. साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या  भाविकांच्या गाडीला वन्यप्राणी धडकल्याने अपघात झाला आहे.

samruddhi mahamarg accident near washim : राज्याच्या विकास मार्ग म्हणून उद्घाटन करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावर अपघात कमी व्हावे यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजना देखील फोल ठरत आहेत. शिवाय या मार्गावरून वन्य प्राणी जाऊ नयेत यासाठी बांधण्यात आलेले कॉरीडओर देखील फोल ठरले आहेत. मंगळवारी रात्री शिर्डीहून साईबाबा यांचे दर्शन घेऊन परत चंद्रपूरला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला नीलगाय धडकल्याने भीषण अपघात झाला. यात कारमधील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ मंगळवारी हा घडला.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

donald trump : बायडेन यांची मानसिकता खराब! राष्ट्राध्यक्ष पदासाठी 'ही' भारतीय वंशाची व्यक्ती योग्य; डोनाल्ड ट्रम्प

समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर आहे. हे वन्य प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत. मंगळवारी चंद्रपूरचे एक कुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन समृद्धी महामार्गाने पुन्हा चंद्रपूरला जात होते. त्यांची गाडी ही वाशिम येथील कारंजा येतील पोहा येथे आली असता महामार्गावरून अचानक कठडे ओलांडून नीलगाय महामार्गावर आली. या नीलगाईला त्यांची गाडी धडकली. या अपघातात गाडीतील सात जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीक तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने जखमींना दावखण्यात भरती केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.

समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांच्या वावरामुळे अपघात वाढले आहे. हा महामार्ग सुरू झाल्यापासून अनेक व्यन्य प्राणी देखील ठार झाले आहे. हा महामार्ग अभयारण्यातून जात असल्याने हे प्राणी महामार्गावर येऊ नये या साठी ओव्हर पास आणि अंडर पास बनवण्यात आले. मात्र, प्राणी यावरून न जाता महामार्गाला लावण्यात आलेले कठडे ओलांडून जात आहेत. त्यामुळे भरधाव वेगात येणारी वाहने त्यांना धडकून अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवा आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या