मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur : गुणरत्न सदावर्तेंवर ब्रिगेडच्या कार्यकर्त्याकडून शाईफेक; घोषणाबाजी करत दाखवले काळे झेंडे

Solapur : गुणरत्न सदावर्तेंवर ब्रिगेडच्या कार्यकर्त्याकडून शाईफेक; घोषणाबाजी करत दाखवले काळे झेंडे

Nov 26, 2022, 03:07 PM IST

    • Gunratna Sadavarte : सोलापूरात वकील गुणरत्न सदावर्ते पत्रकार परिषद घेत असताना अचानक त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली.
Gunratna Sadavarte In Solapur (HT)

Gunratna Sadavarte : सोलापूरात वकील गुणरत्न सदावर्ते पत्रकार परिषद घेत असताना अचानक त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली.

    • Gunratna Sadavarte : सोलापूरात वकील गुणरत्न सदावर्ते पत्रकार परिषद घेत असताना अचानक त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली.

Gunratna Sadavarte In Solapur : राज्यातील वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भरपत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदावर्ते हे महाराष्ट्राचे तुकजे करायला निघाले असून त्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केला, अशा घोषणा देत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सोमनाथ राऊत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाई फेकत त्यांचा निषेध केला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

नेमकं काय झालं?

गुणरत्न सदावर्ते हे सोलापूरात आले असता त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पत्रकार परिषद घेतली. ते माध्यमांशी संवाद साधत असतानाच अचानक एका संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानं जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळं उपस्थितांनी घोषणाबाजी करणाऱ्याला पकडलं. परंतु तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानं सदावर्तेंवर शाई फेकली. याशिवाय काळे कपडे दाखवत सदावर्तेंचा निषेधही केला.

सदावर्तेंच्या वेगळ्या राज्याच्या मागणीमुळं झाला संतापाचा उद्रेक...

काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्तेंनी महाराष्ट्रातून वेगळ्या राज्याची मागणी केली होती. त्यामुळं सदावर्ते हे महाराष्ट्र तोडायला निघाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यानंही त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या