मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sadabhau khot “…अन्यथा शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या”, सदाभाऊ खोतांचा सरकारवर संताप

Sadabhau khot “…अन्यथा शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या”, सदाभाऊ खोतांचा सरकारवर संताप

Aug 21, 2023, 11:40 PM IST

  • Onion Export Duty : निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला आहे.

Sadabhau khot

Onion Export Duty : निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला आहे.

  • Onion Export Duty : निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला आहे.

टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे कांद्याच्या दरात घसरण होईल अशी भीती शेतकऱ्यांना असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की,सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे. कांद्याला चांगला दर मिळत असतानाच सरकारने हा शेतकरीविरोधी निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल फुकट खायचा असेल तर शेतजमीन सरकारने ताब्यात घ्यावी आणि मंत्रालयातील क्लार्कप्रमाणे शेतकरी कुटुंबाला महिन्याला पगार द्यावा. ते जमणार नसेल तर शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या. आम्ही धान्य पिकवायचे बंद करतो, तुम्हाला कुणाच्या शेतात धान्यपिके पिकवायची असेल तिकडे पिकवा, असा संताप खोत यांनी व्यक्त केला.

तर कोणी टाचा घासून मेलंय का?- खोत

जर कांद्याचा भाव वाढला तर कांदा खाऊ नका. कांदा नाही खाल्ला तर कुणी टाचा घासून मेलंय का? शेतकऱ्याला २ पैसे जास्त मिळाले तर शेतकऱ्याचे खळे त्याच्या डोळ्यादेखत लुटलं जातंय हे कुठेतरी बंद व्हायला हवे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने माजी प्रदेशाध्यक्ष दिल्लीत गेले, ते उद्या निवेदन देतील. पुढच्या महिन्यात आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिकपासून आंदोलनाला सुरुवात करत असल्याचा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

 

दरम्यान मंत्री दादा भूसे नाशिकमध्ये म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाहीत, याची काळजी राज्य सरकार घेईल. कांदा जास्त दिवस टिकवता येत नाही. त्याच्यावर प्रक्रिया करुन टिकवण्यासाठीचा मोठा खर्च येतो. त्यामुळे उद्या कांदा २५ रुपयावर गेला तर, ज्याला परवडत नाही, त्याने २ ते ३ महिने कांदा खाल्ला नाही तर कुठे बिघडतंय, असे म्हणत दादा भुसे यांनी काद्यावरील निर्यात बंदीच्या निर्णायावर भाष्य केलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या