मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Athawale : ..तर ‘या’ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार, रामदास आठवलेंनी केलं स्पष्ट

Ramdas Athawale : ..तर ‘या’ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार, रामदास आठवलेंनी केलं स्पष्ट

Mar 12, 2023, 07:46 PM IST

  • Ramdas Athawale : भाजप नेत्यांनी विश्वास दाखवल्यास पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आरपीआय नेते रामदास आठवले यांनी बोलून दाखवले आहे.

रामदास आठवले

Ramdas Athawale : भाजप नेत्यांनी विश्वास दाखवल्यास पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आरपीआय नेते रामदास आठवले यांनी बोलून दाखवले आहे.

  • Ramdas Athawale : भाजप नेत्यांनी विश्वास दाखवल्यास पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आरपीआय नेते रामदास आठवले यांनी बोलून दाखवले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाला नागालँड विधानसभेत दोन जागा मिळाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये नागालँड राज्यात रिपाईचे दोन आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे. शिर्डीत रिपाई पक्षाचं महाधिवेशनआयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

रामदास आठवले म्हणाले की, मागच्या निवडणुकीत मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र आता मला पुन्हा शिर्डीतूनच उभं राहण्याची इच्छा आहे. जर भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डीतून लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवेल. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी माझा प्रयत्न असेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आठवले म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी पक्ष सक्रीय झाला असून शिर्डीत पक्षाचे महाअधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान यावेळी बोलताना आठवले यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा माझा पक्ष मोठा असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय लोकशाहीनुसार झाला आहे.

 

निवडणूक आयोगानं बहुमताच्या बाजुनं निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरेंनी अगोदरच भाजपसोबत सरकार स्थापन करायला पाहिजे होते. भाजपसोबत सरकार स्थापन केले असते तर आज ही वेळ आली नसती, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या