मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सुप्रीम कोर्टाचा निकालही एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागेल, रामदास आठवलेंचे मोठं विधान

सुप्रीम कोर्टाचा निकालही एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागेल, रामदास आठवलेंचे मोठं विधान

Mar 01, 2023, 10:56 PM IST

  • Ramdas aathwale on uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना रामदास आठवलेंनी मोठं विधान करत सर्वोच्च न्यायालयातील निकालही एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागेल, असं म्हटलं आहे.

Ramdas aathwale on uddhav Thackeray

Ramdas aathwale on uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना रामदास आठवलेंनी मोठं विधान करत सर्वोच्च न्यायालयातील निकालही एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागेल,असं म्हटलं आहे.

  • Ramdas aathwale on uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना रामदास आठवलेंनी मोठं विधान करत सर्वोच्च न्यायालयातील निकालही एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागेल, असं म्हटलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच शिवसेना नाव व चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयातही एकनाथ शिंदेंच्या बाजुने निकाल लागेल, असा आम्हाला विश्वास आहे, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

रामदास आठवले नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे. उद्धव ठाकरेंची खोटी शिवसेना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता शिवसेनेचं नाव वापरण्याचा अधिकार राहिला नाही. हा उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातला अत्यंत जबरदस्त धक्का आहे. त्याला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच जबाबदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला नसता आणि भाजपाबरोबरची युती तोडली नसती, तर उद्धव ठाकरेंवर ही नामुष्कीची वेळ आली नसती, असेही रामदास आठवले म्हणाले. 

रामदास आठवलेंनी संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानाचाही समाचार घेतला. चोर कोण आहे? ते सगळ्यांनी पाहिलं आहे. तुरुंगात कोण जाऊन आलं, हेही सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे विधिमंडळाला चोर म्हणणं, ही गोष्ट अजिबात बरोबर नाही,” अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. 

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर मूळ शिवसेना कोणाची तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तर निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजुने निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना रामदास आठवलेंनी मोठं विधान करत सर्वोच्च न्यायालयातील निकालही एकनाथ शिंदे यांच्या बाजुने लागेल, असं म्हटलं आहे. 

यावेळी कविता सादर करत रामदास आठवले म्हणाले की, “ते ४० जण नाहीत चोर… संजय राऊतांनी करू नये शोर… संजय राऊतांनी कितीही शोर केला तरी ते ४० आमदार हिंमतवाले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत तर त्यांनीच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच त्यांनी शिवसेनेतून बाहेर केलं आहे.

 

पुढील बातम्या