मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar: आता अति होतंय; जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच आमदार रोहित पवार भडकले!

Rohit Pawar: आता अति होतंय; जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच आमदार रोहित पवार भडकले!

Nov 14, 2022, 11:15 AM IST

  • Rohit Pawar on Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Rohit Pawar - Jitendra Awhad

Rohit Pawar on Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • Rohit Pawar on Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

थिएटरमधील मारहाण प्रकरणात सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोनच दिवसांत पुन्हा गुन्हा दाखल झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. राजकीय सूड भावनेतून आव्हाड यांना लक्ष्य केलं जात आहे, असा राष्ट्रवादीचा आरोप आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘सरकारचं आता अति होतंय,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाणे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेनं केली होती. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेनं ज्या आधारे ही तक्रार केली, त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आव्हाड हे संबंधित महिलेला बाजूला करताना व्हिडिओत दिसत आहेत. तत्पूर्वी, ते एका पुरुषालाही बाजूला करताना दिसत आहेत.

हे सगळं प्रकरण आता चिघळू लागलं असून आव्हाड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी यावर ट्वीट केलं आहे. ‘एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे. ‘तक्रारदार महिलेची राजकीय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?,’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

'छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता', स्वर्गीय अटलजींच्या या ओळी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच लक्षात घेतील, असंही रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे. 

आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ नये. आपण लढू आणि जिंकू, असं आवाहनही रोहित पवार यांनी केलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या