मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai: नवी मुंबईत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले; धक्कादायक माहिती उघड

Navi Mumbai: नवी मुंबईत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले; धक्कादायक माहिती उघड

Apr 11, 2023, 04:25 PM IST

  • Navi Mumbai: नवी मुंबई गेल्या महिन्यात महिलेची हत्या करून फरार असलेल्या रिक्षा चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Mumbai Crime

Navi Mumbai: नवी मुंबई गेल्या महिन्यात महिलेची हत्या करून फरार असलेल्या रिक्षा चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • Navi Mumbai: नवी मुंबई गेल्या महिन्यात महिलेची हत्या करून फरार असलेल्या रिक्षा चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील अडवली भुतवली गावालगतच्या जगलामध्ये २२ मार्च रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. जवळपास २० दिवसानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेची हजार रुपयांची मागणी केली म्हणून आरोपीच्या तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अहमद मोहम्मद अली साईन (वय, ३६) असे अटक करण्यात आलेल्या अरोपीचे नाव आहे. आरोपी हा रिक्षा चालक आहे. दरम्यान,आरोपी २२ मार्च रोजी महिलेला घेऊन महापे- शिळफाटा येथील अडवली भुतवली गावालगच्या जंगालात घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर महिलेने त्याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. परंतु, आरोपी तिला पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.

आरोपीच्या शोध घेताना पोलिसांना अनेक अडचणींचा शोध घ्यावा लागला. हत्या जंगलात करण्यात आल्याने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यातही अडचण येत होते. मात्र, पोलिसांनी आपला शोध थांबवला. घटनास्थळावरून काहीच अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मृत महिलेला रिक्षातून घेऊन जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानुसार पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर या हत्येशी संबंधित त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला तुर्भे इंदिरा नगर परिसरातून आरोपीच्या रिक्षात बसली होती. पुढे अडवली भुतवली परिसरातील निर्जन स्थळी आणि आरोपीने महिलेसोबत शारिरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिलेने आरोपीकडे पैसे मागताच दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड घालून घटनास्थळावरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी स्थानिक लोकांना संबंधित महिलेच्या मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या