मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Whale Fish At Ganpatipule : दोन वेळा समुद्रात सोडलेला व्हेल मासा पुन्हा गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी

Whale Fish At Ganpatipule : दोन वेळा समुद्रात सोडलेला व्हेल मासा पुन्हा गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी

Nov 15, 2023, 09:08 PM IST

  • Whale Fish at Ratnagiri Beach : २० फूट लांब आणि पाच टन वजनाचा व्हेल मासा दोन वेळा समुद्रात सोडूनही पुन्हा किनाऱ्याला आले आहे. 

Whale Fish at Ratnagiri Beach

Whale Fish at Ratnagiri Beach : २० फूट लांब आणि पाच टन वजनाचा व्हेल मासा दोन वेळा समुद्रात सोडूनही पुन्हा किनाऱ्याला आले आहे.

  • Whale Fish at Ratnagiri Beach : २० फूट लांब आणि पाच टन वजनाचा व्हेल मासा दोन वेळा समुद्रात सोडूनही पुन्हा किनाऱ्याला आले आहे. 

Whale Fish : तब्बल ४० तास रेस्क्यू ऑपरेशन करून गणपतीपुळेच्या समुद्रात सोडलेले व्हेल माशाचे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले आहे. त्याचबरोबर बराच वेळ ते पाण्याबाहेर राहिल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. व्हेलला जिवंत समुद्रात सोडण्याचं देशातील पहिलंच रेस्क्यु ऑपरेशन १३ व १४ नोव्हेंबर रोजी पार पडलं होतं. रात्री उशिरा व्हेल मासा समुद्रात सुखरुप गेला होता मात्र आज पुन्हा ते समुद्रकिनारी आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

सोमवारी, १३ नोव्हेंबर रोजी सकाळीसाडे सहा ते सातवाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर आढळलं होतं. १३नोव्हेंबर रोजी जवळपास तीन वेळा व्हेल समुद्रात सोडलं गेलं. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसले. त्यानंतर पुन्हा एकदा'ऑपरेशन व्हेल' सुरू करून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सुखरुप सोडले. मात्र, आज, (बुधवार) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेबी व्हेल मासा पुन्हा समुद्रकिनारी आला.

 

समुद्र किनारी आलेले व्हेल माशाचे पिल्लू तब्बल २० फूट लांब आणि पाच टन वजनाचे आहे. पर्यटक, स्थानिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हेल भरतीच्या वेळी समुद्रात सोडले गेले मात्र हा मासा पुन्हा किनाऱ्यावर आला आहे. दोन क्रेनच्या साह्याने या पाच टन वजनाच्या व्हेलला समुद्रात सोडले होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या