मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रत्नागिरी : ब्रेक फेल झालेला टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू

रत्नागिरी : ब्रेक फेल झालेला टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू

Sep 28, 2023, 09:00 PM IST

  • Ratnagiri ganesh visarjan : रत्नागिरी जिल्ह्यात ब्रेक फेल झालेला टेम्पो चक्क गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला. या अपघातात दोन गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे.

Ratnagiri ganesh visarjan accident

Ratnagiri ganesh visarjan : रत्नागिरी जिल्ह्यात ब्रेक फेल झालेला टेम्पो चक्क गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला. या अपघातात दोन गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे.

  • Ratnagiri ganesh visarjan : रत्नागिरी जिल्ह्यात ब्रेक फेल झालेला टेम्पो चक्क गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला. या अपघातात दोन गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे.

राज्यभरात गणेश विसर्जानाची धुम पाहायला मिळत असताना काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकीत कोकणात एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झालेला टेम्पो चक्क गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला. या अपघातात दोन गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

हा अपघात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये झाला आहे. गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर येथे ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. 

पाचेरी आगर गावात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत गणेश भक्तांची गर्दी होती. यावेळी समोरून येणारा टेम्पो ब्रेक फेल झाल्याने थेट मिरवणुकीत घुसला. यात अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर  १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 रायगडमध्ये चार गणेश भक्त वाहून गेले -

कर्जत तालुक्यातील उक्रुळ गावात गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेले चार गणेश भक्त उल्हास नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरातील उत्सवावर शोककळा पसरली आहे. 

गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण चार जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यापैकी एक सुखरुप बचावला आहे. एकाचा मृतदेह सापडला आहे. तर, दोन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. बेपत्ता गणेश भक्तांचा शोध सुरु आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या