मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “मशिदींवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरांवर..”, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना सल्ला

“मशिदींवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरांवर..”, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना सल्ला

Mar 26, 2023, 07:53 PM IST

  • Ramdas Athawale on raj Thackeray : मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे लावायला काय हरकत नाही. त्यांनी मुस्लिमांच्या भोंग्याला विरोध करू नये. असा सल्ला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना सल्ला

Ramdas Athawale on raj Thackeray : मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे लावायला काय हरकत नाही. त्यांनी मुस्लिमांच्या भोंग्याला विरोध करू नये. असा सल्ला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

  • Ramdas Athawale on raj Thackeray : मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे लावायला काय हरकत नाही. त्यांनी मुस्लिमांच्या भोंग्याला विरोध करू नये. असा सल्ला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

Ramdas Athawale on raj Thackeray : राज ठाकरेंनी पुन्हा भोंग्यांचा विषय काढू नये. त्यांनी आपला पक्ष वाढवावा. आपले उमेदवार निवडणूक आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे लावायला काय हरकत नाही. त्यांनी मुस्लिमांच्या भोंग्याला विरोध करू नये. असा सल्ला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना आठवले यांनी हे विधान केले.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

रामदास म्हणाले की, राज ठाकरे आता मशिदीवरील भोंग्याला विरोध करत आहेत. पण सुरुवातीला त्यांनी आपल्या झेंड्यात हिरवा, निळा आणि भगवा रंग लावला होता. आता त्यांनी भोंग्यांच्या विरोधात बोलणं योग्य नाही. 

रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे गर्दी जमवण्यात निपुण आहेत. त्यांनी आपला पक्ष वाढवावा. त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये. मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील, याचा विचार राज ठाकरे यांनी करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी मुंबईतील विद्युत रोषणाईला डान्सबार म्हणणं योग्य नाही. मुंबईला सुंदर करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत आहे. त्याला डान्सबार बोलणं योग्य नाही.

मनसेला महायुतीत घेण्याबाबत रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांनी चांगलं काम करावं. आपला पक्ष वाढवावा. पण आगामी निवडणुकीत शिवसेना व भाजपसोबत रिपाइं असल्याने राज ठाकरेंची महायुतीत गरज नाही. आमच्या युतीत राज ठाकरेंना घेऊन चालणार नाही. यामुळे भाजपाची राष्ट्रीय पातळीवर अडचण होण्याची शक्यता आहे. 

पुढील बातम्या