मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत रामदास आठवलेंचा मोठा दावा, म्हणाले सर्वात आधी मीच..

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत रामदास आठवलेंचा मोठा दावा, म्हणाले सर्वात आधी मीच..

Nov 01, 2023, 06:01 PM IST

  • Ramdas Athawale on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात तीव्र आंदोलन सुरू आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी सर्वात आधी मीच मागणी केली होती, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

Ramdas Athawale on maratha reservation

Ramdas Athawale on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात तीव्र आंदोलन सुरू आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी सर्वात आधी मीच मागणी केली होती, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

  • Ramdas Athawale on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात तीव्र आंदोलन सुरू आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी सर्वात आधी मीच मागणी केली होती, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आहे. जरांगेंच्या उपोषणाला तसेच मराठा आरक्षणाला राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणावर बोलताना मराठ्यांना आरक्षण देण्याची सर्वात आधी मागणी मीच केली होती, असा दावा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

रामदास आठवले म्हणाले राज्यात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन केले जात आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वात पहिली मागणी मी आणि माझ्या पक्षाने केली होती. असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

अन्य वर्गाला अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ओबीसीत कोणाला टाकायचे याचा आमच्या मंत्रालयाला प्रस्ताव दिला तर आम्ही तो पुढे करू आणि आरक्षण देण्याचा प्रयत्न करु, मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपणदेखील आंदोलन करा, असे रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले की, सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायचे असं नाही ज्यांचं उत्पादन ८लाखांच्या आत आहे, त्यांना आरक्षण द्यावे अशी जरांगे (Manoj Jarange Patil) यांची मागणी आहे. आताचे आंदोलन तीव्र झाले आहे. सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे. सरकारने आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

पुढील बातम्या