मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  फडणवीसांच्या डोक्यात गणित, म्हणूनच..., विजयानंतर धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

फडणवीसांच्या डोक्यात गणित, म्हणूनच..., विजयानंतर धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

Jun 11, 2022, 09:20 AM IST

    • शिवसेनेचे संजय पवार आणि  भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत निर्माण झाली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक (फोटो - दीपक साळवी)

शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत निर्माण झाली होती.

    • शिवसेनेचे संजय पवार आणि  भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत निर्माण झाली होती.

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झालेत तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा धक्का बसला. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पहाटे निकाल लागला. यात भाजपचे अनिल बोंडे, पीयूष गोयल, धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी हे विजयी झाले. दरम्यान, खरी चुरस भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांच्यात बघायला मिळाली. यात धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या रणनितीमुळे तिन्ही उमेदवार निवडून आले" असं महाडिक म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

धनंजय महाडिक यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "भाजपचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब , चंद्रकांतदादा पाटील यांच्या कष्टामुळं, रणनितीमुळं भाजपचे उमेदवार निवडून आले. कोणतीही निवडणूक असली की, टेन्शन असतंच. ज्या दिवशी अर्ज भरला, तेव्हाच सांगितलं होतं की, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. कारण, फडणवीस साहेबांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसतं."

भाजपनं ज्या पद्धतीनं माझं नाव घोषित केलं. जे गणित आखलं, जी रणनिती आखली, त्यामुळं आम्ही या निवडणुकीत यश संपादीत करु शकलो, याचा मला आनंद आहे. या निवडणुकीत माझा फक्त मुलगाच नाही, तर माझे सगळे भाऊ, माझी मुलं, माझी पत्नी, मित्र परिवार, मुंबईत ठाण मांडून होते असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं.

भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर शिवसेनेचे संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32, तर भापजचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 25 मतं मिळाली होती. संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत निर्माण झाली होती. पण, दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये महाडिकांना जास्त मते मिळाल्यानं त्यांचा विजय निश्चित झाला.

पुढील बातम्या