मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘अयोध्येला जायला राज ठाकरे घाबरले; आता तब्येतीची कारणे देत आहेत’

‘अयोध्येला जायला राज ठाकरे घाबरले; आता तब्येतीची कारणे देत आहेत’

May 22, 2022, 08:38 PM IST

    • समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची पुण्यात राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची पुण्यात राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

    • समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची पुण्यात राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

पुणे : राज ठाकरे हे अयोध्येला जाण्यासाठी घाबरले आहेत. आता ते तब्येतीची कारणे सांगत आहेत. हे त्यांचे बहाणे असून त्यांनी आता उत्तरभारतीय नागरिकांची माफी मागण्याची वेळ आली आहे. उत्तर भारतीयांनी त्यांना माफ केले तरच त्यांनी अयोध्येला जावे, अशी टीका समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य करत केली.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे रविवारी पुणे दौ-यावर आले होते. यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलतांना वरिल टीका केली. आझमी म्हणाले, सध्या राज ठाकरे हे बिचारे झाले आहेत. त्यांचे राजखारण खूप अडचणीत आले आहे. त्यांना सध्या कुणीही विचारत नाही. यामुळे ते सैरभेर झाले आहे. विधान सभेत मी जेव्हा हिंदी मध्ये शपथ घेत होतो, तेव्हा त्यांच्या आमदारांनी मोठा गदरोळ केला होता. या सोबतच मुंबईत त्यांनी अनेक उत्तर भारतीयांना मारहाण केली. त्यामुळे आज ते अयोध्येला जायला घाबरत आहेत. राज ठाकरे यांनी जे केले ते त्यांना इथेच भरावे लागणार आहे. उत्तर प्रदेशात राम भगवान, श्रीकृष्ण यांचा जन्म झाला त्याच उत्तर भारतीयांना सन्मान मात्र त्यांनी दिला नाही. आज भाजपचाच खासदार त्यांना तेथे येऊ देण्यास विरोध करतोय. माझ्यामते ही भाजप आणि मनसेची मिलीभगत आहे. त्यांना जर आज अयोध्येला जायचे असेल तर त्यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. त्यांनी असे केले तर तेथील नागरिक त्यांना त्या ठिकाणी येऊ देतील.

महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज ठाकरे यांनी आज हिंदूत्ववादाचा स्विकार केला आहे. राज्याच्या विरोधात ठाकरे जात असतांनाही राज्य सरकार राज ठाकरे यांना अटक करण्यास घाबरत आहेत. हे चूकीचे आहे. सरकार घाबरत आहे. जर त्यांनी ठाकरे यांना अटक केली, तर त्यांच्या वोट बँकेवर परिणाम होईल. या भीतीमुळेच सरकार ठाकरे यांना अटक करत नाही अशी टीकाही आझमी यांनी सरकारवर केली. राज्यात मोठा हिंदूत्ववादी कोण आहे याची चढाओढ लागली आहे. शिवसेनेप्रमाणे भाजपही आम्हीच मोठे हिंदूत्ववादी आहोत या स्पर्धेत लागली आहे.

बाबरी मस्जित कुणी तोडली यावरूनही राज्यात चढाओढ लागली आहे. मतांच्या गणितासाठी हे सगळे सुरू आहे. उद्धव ठाकरे हे म्हणाले होते की ३० वर्षांपासून युतीत सडलो. आज तुम्ही भाजपला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेलात. एकीकडे सेक्यूूलर पक्षात जाता आणि स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणता. या ऐवजी तूम्ही सेक्युलरिझमचा प्रचार का करत नाही? असा थेट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आबू आझमी यांनी केला.

ज्ञानव्यापी मस्जिद प्रकारणावरून केंद्रसरकारव टीका करतांना अबू आझमी म्हणाले, आज देश हा नरसंहाराच्या दिशेने जात आहे. बाबरी मस्जिद प्रकरणी आम्ही गुपचूप निकाल मान्य केला. आता ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरण पुढे आणले जात आहे. देशात हाच विषय आहे का? या प्रकरणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकसे तक्रारही केली आहे. पण दोषींवर कारवाई केली जात नाही.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या