मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कार्यकर्त्यांच्या धरपकडीमुळं राज भडकले; सीएमना म्हणाले, सहनशीलतेचा अंत पाहू नका!

कार्यकर्त्यांच्या धरपकडीमुळं राज भडकले; सीएमना म्हणाले, सहनशीलतेचा अंत पाहू नका!

May 10, 2022, 06:12 PM IST

    • मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र : राज्यशासनाने त्वरित कारवाई करावी, सत्ता येत जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही
MNS chief Raj Thackeray’ (HT_PRINT)

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र : राज्यशासनाने त्वरित कारवाई करावी, सत्ता येत जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही

    • मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र : राज्यशासनाने त्वरित कारवाई करावी, सत्ता येत जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही

मुंबई : भोंग्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मशिदीवरील भोंग्या बाबत अल्टिमेटम दिला आहे. राज्यशासनाने त्वरित कारवाई करावी, सरकारने मनसेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये असा थेट इशारा या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

राज ठाकरे यांनी लिलिलेल्या पत्रामुळे पुन्हा आता राज्यातील राजकारण पेटण्याची चिन्हे दिसत आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सरकारला विनंती करत सूचक इशारा दिला आहे. त्यांनी हे पत्र त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरही प्रसिद्ध केले आहे. उद्धव ठाकरे यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, सरकारला माझे एकच सांगणे आहे की, राज्य सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सत्ता येत जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. मनसेतर्फे करण्यात येणारे आंदोलन लाऊड स्पिकर संदर्भात आहे. आवाजामुळे होणा-या प्रदुषणाच्या विरोधात आम्ही आहोत. मात्र, राज्य सरकारन मनसैनिकांवर चुकीच्या पद्धतीने आंदोलन करत आहे.

 

राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माज्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरु करण्यापूर्वी ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजोरोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबले, कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनअधिककृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेला आठवडा महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे हे पाहता मला प्रश्न पडला आहे की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी 'धरपकड मोहीम' राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत जणू, ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातील 'रझाकार' आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

त्यामुळे राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!

पुढील बातम्या