मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात राज ठाकरे घेणार समाचार ! ओवसी, औरंगजेबाची कबर या विषयांवर तोफ धडाडणार

पुण्यात राज ठाकरे घेणार समाचार ! ओवसी, औरंगजेबाची कबर या विषयांवर तोफ धडाडणार

May 19, 2022, 11:31 PM IST

    • सभेचे पोस्टर झाले प्रसिद्ध : २२ मे रोजी होणार सभा
राज ठाकरे यांच्या सभेचे पोस्टर

सभेचे पोस्टर झाले प्रसिद्ध : २२ मे रोजी होणार सभा

    • सभेचे पोस्टर झाले प्रसिद्ध : २२ मे रोजी होणार सभा

 पुणे : ५ जुन रोजी राज ठाकरे हे अयोध्येला जाण्यापूर्वी पुण्यात जाहीर सभा घेणार आहे. या सभेत ते अयोध्या दौ-या बाबत खुलासा करणार असल्याचे वृत्त आहे. या सोबतच ते अनेकांचा समाचार या सभेत घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या सभेचे पोस्टर आणि व्हॉट्सअ‍ॅप मॅसेच सोशल मिडीयावर फिरत आहेत. त्यातून सभेदरम्यान ठाकरे यांनी कुणा कुणाचा समाचार घेणार याचे सुतोवाच केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे. त्यांच्या या दौ-यावरूनही राजकारण तापले आहे. या दौ-यापूर्वी ते पुण्यात आले होते. दरम्यान प्रकृती अस्वास्थामुळे ते पुन्हा मुंबईत परतल्याने ही सभा होणार की नाही या बाबत प्रश्नचिंन्ह निर्माण झाले होते. दरम्यान सभेची तारीख ही २१ मे ठरली होती. मात्र, यात बदल होऊन ही सभा आता २२ मे रोजी होणार आहे. राजहे त्यांच्या ठाकरे शैलीत कुणाकुणाचा या सभेत समाचार घेणार या विषयी उत्कंठा ताणून गेली आहे. अनेकांनी या बाबत तर्क वितर्क लढविण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान राज यांच्या सभेच्या पोस्टर वरून या सभेर राज हे अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगजेबाची कबर या विषयांवर त्यांची तोफ धडाडणार आहे. या बाबतचे स्पष्ट संकेत पुणे शहर मनसेने जाहीर केलेल्या पोस्टरवरुन मिळत आहेत.

या पोस्टरमध्ये ‘ बुडाला औरंग्या पापी, म्लेंछसंव्हार जाहालो !! मोडलीं मांडली छेत्रें, आनंदवनभुवनी या ओव्या राज यांच्या पोष्टरवर पाहायला मिळत आहे. दरम्यान एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंना तुम्हाला कोण विचारत या शब्दांमध्ये टीका केली होती. कुत्र्यांना भोकू द्यावे. सिंह शांततेत चालतो, असे ते म्हणाले होते. याला राज ठाकरे काय प्रत्यूत्तर देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या