मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाळासाहेब फार वेगळं नेतृत्व, राज ठाकरे त्यांना कधीच कॉपी करू शकणार नाहीत - आठवले

बाळासाहेब फार वेगळं नेतृत्व, राज ठाकरे त्यांना कधीच कॉपी करू शकणार नाहीत - आठवले

May 05, 2022, 03:51 PM IST

    • बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोपं काम नसून राज ठाकरे कधीच बाळासाहेबांना कॉपी करू शकणार नाहीत, असा घणाघात आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी घातला आहे.
रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

बाळासाहेबांची कॉपी करणं एवढंसोपं काम नसून राज ठाकरे कधीच बाळासाहेबांना कॉपी करू शकणार नाहीत, असा घणाघात आरपीआयचे नेतेरामदास आठवलेयांनी घातला आहे.

    • बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोपं काम नसून राज ठाकरे कधीच बाळासाहेबांना कॉपी करू शकणार नाहीत, असा घणाघात आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी घातला आहे.

मुबंई - राज ठाकरे हे कधीच बाळासाहेबांची कॉपी करू शकत नाहीत. बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं, मशिदीवरील भोंगे काढा अशी भूमिका कधी बाळासाहेबांनी घेतलेली नव्हती. त्यांनी नेहमी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता. फक्त दहशतवादी मुस्लिमांना त्यांचा विरोध होता. त्यामुळे बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोपं काम नसून राज ठाकरे (Raj Thackeray) कधीच बाळासाहेबांना कॉपी करू शकणार नाहीत, असा घणाघात आरपीआयचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas athawale) यांनी घातला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंगे हटवा व मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या भूमिकेचा आठवले यांनी पहिल्यापासून विरोध केला आहे. यापूर्वी आठवले म्हणाले होते की, मशिदीवरील भोंग्याचे आरपीआय कार्यकर्ते रक्षण करतील. अजानची वेळ दोन ते तीन मिनिटे असते. भोंगे दिवसभर वाजत नसतात. तसाच मुस्लिमांना संविधानाने काही अधिकार दिले आहेत. कोणी संविधानविरोधी काम करत असेल तर आम्ही त्याला विरोध करू, असे आठवले म्हणाले.

राज्यभरात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने बुधवारपासून आंदोलन पुकारलं आहे. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. यावर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे हे सातत्याने त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे काम करीत आहेत. भगवा रंग हा शांतीचा, वारकरी सांप्रदायाचा रंग आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्यासंबंधातील भूमिकेशी आपण अजिबात सहमत नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

आठवले म्हणाले की, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची अचानक मागणी करीत मशिदीसमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालिसा वाचण्याची भूमिका घेतली आहे. राज ठाकरे म्हणतात तसा हा प्रश्न सामाजिक नसून धार्मिक स्वरूपाचा आहे. धर्माचा बुरखा घालून कोणी संविधानाविरोधात काम करीत असेल तर आमचा त्यांना विरोध असणार आहे, असा इशाराही त्यांनी मनसेला दिला.  

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या