मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "..त्यामुळे मी धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

"..त्यामुळे मी धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Jun 12, 2022, 07:54 PM IST

    • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केले आहे. राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे, मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 
राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केले आहे. राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे, मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

    • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केले आहे. राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे, मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कोणीही येऊ नये असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

Raj Thackeray Big Announcement – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केले आहे.राज ठाकरे गेल्याकाही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत. राज यांच्याहिप बोनवर शस्त्रक्रिया करण्यात येणारअसल्यामुळेते आवश्यक ती काळजी घेत आहेत. या दरम्यान, राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे. या अनुषंगाने राज यांनी त्यांच्या तमाममनसेकार्यकर्त्यांनाएक आवाहन केले आहे. एका ऑडियो क्लिपच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळी करता आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी (१४ जून) माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी दरवर्षी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळतं. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नाही.

पुढे राज ऑडियो क्लिपमध्ये असेही म्हणाले की, माझ्या शस्त्रक्रियेला आधीच विलंब झाला आहे. जर या वाढदिवशी बाहेरून काही लोक मला भेटले आणि त्यांच्याशी माझा संपर्क आल्याने पुन्हा कोविड किंवा काही त्रास झाला तर पुन्हा ही शस्त्रक्रिया लांबवावी लागेल. त्यामुळे यंदा कोणीही मला भेटायला येऊ नका. कारण शस्त्रक्रिया किती काळ लांबवायची यालाही मर्यादा आहेत. आपण सारे जिथे आहात तिथेच राहा आणि शुभेच्छा द्या. शस्त्रक्रियेनंतर मी तुम्हा सर्वांना निश्चित भेटेन. पण सध्या मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही, त्यामुळे १४ तारखेला वाढदिवशी मी कोणालाही न भेटण्याचा निर्णय केला आहे, अशी घोषणा राज यांनी ट्वीटवरून केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या