मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Forecast : परतीच्या पावसाचा जोर पुढील ३-४ दिवस राहणार कायम !

Weather Forecast : परतीच्या पावसाचा जोर पुढील ३-४ दिवस राहणार कायम !

Oct 15, 2022, 05:08 PM IST

    • हवामान विभागानुसार यावर्षी ३-४ ऑक्टोबरपासून परतीचा मान्सून काळ सुरू झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
संग्रहित छायाचित्र

हवामान विभागानुसार यावर्षी३-४ऑक्टोबरपासून परतीचामान्सून काळ सुरू झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागातून माघार घेईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

    • हवामान विभागानुसार यावर्षी ३-४ ऑक्टोबरपासून परतीचा मान्सून काळ सुरू झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबई-पुण्यापासून संपूर्ण राज्यात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून झोडपून काढले आहे. पुण्यातील रस्त्यांना तर नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

SSC Board result 2024 : पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

Mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

हवामान विभागानुसार यावर्षी ३-४ ऑक्टोबरपासून परतीचा मान्सून काळ सुरू झाला आहे. परतीच्या पावसाचा परिणामही राज्यभरात दिसून येत आहे. शुक्रवारी परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. १६ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र,  विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच १७ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १८ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

मान्सून माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मान्सून गायब होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या