मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain Alert : राज्यात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार! गुरुवारी ५ जिल्ह्यांना रेड तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain Alert : राज्यात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार! गुरुवारी ५ जिल्ह्यांना रेड तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Jul 26, 2023, 11:08 PM IST

  • Maharashtra rain alert : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

rain alert

Maharashtra rain alert : हवामान विभागाच्या अंदाजानुसार,बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

  • Maharashtra rain alert : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra rain alert : भारतीय हवामान विभागाने मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.पावसाच्या रेड अलर्टनंतर मुंबई, रत्नागिरी व चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाने गुरुवारी ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

 

..या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट -

रेड अलर्ट असलेल्या पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. आज सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान मुंबईत आता रेड अलर्ट देण्यात आला आहे.

 

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसंच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसंच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या