मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, या मार्गावर सुरू होणार नवी लोकल रेल्वे

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, या मार्गावर सुरू होणार नवी लोकल रेल्वे

Jul 09, 2023, 09:25 AM IST

    • Mumbai Local Train : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील नव्या मार्गांवर लोकल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Navi Mumbai Local Train (Nitin Lawate )

Mumbai Local Train : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील नव्या मार्गांवर लोकल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    • Mumbai Local Train : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील नव्या मार्गांवर लोकल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Navi Mumbai Local Train : मुंबईसह उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने शहरातील अनेक भागांना जोडणाऱ्या लोकल सेवा सुरू केलेल्या आहे. परंतु आता नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलापूर-खारकोपर-उरण या मार्गावर नव्याने लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळं आता नवी मुंबईतून खारकोपर आणि उरणच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

मुंबईसह उपनगरांच्या भागांमध्ये पूर्ण झालेल्या तसेच अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पांचा रेल्वे मंत्रालयाकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यात बेलापूर-खारकोपर आणि उरण पर्यंतच्या लोकल सेवेचा मुद्द्यावर चर्चा झाली. त्यावेळी रेल्वेने पुढील १० दिवसांत या मार्गावर नवी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खारकोपर-उरण रेल्वे मार्गातील अडचणी दूर करून तो पुढील १० दिवसांत प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. १९९७ साली या प्रकल्पाला राज्य सरकार तसेच रेल्वेकडून मंजूरी देण्यात आली होती. परंतु सततच्या अडचणींमुळं हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. त्यानंतर हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पहिल्या टप्प्यात बेलापूर-नेरूळ ते खारकोपर आणि दुसऱ्या टप्प्यात खारकोपर ते उरण अशी कामं केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास ७५० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मुंबईसह उपनगरांच्या भागांमध्ये सातत्याने प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना दिसून येत आहे. त्यामुळं रेल्वेसमोरील आव्हानंही वाढत आहे. त्यामुळंच आता रेल्वेचा मुंबईत सातत्याने विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळंच आता नवी मुंबईत आणखी एक लोकल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पुढील बातम्या