मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PMC website crash : पुणे महानगर पालिकेची वेबसाइट क्रॅश; मिळकत कर भरतांना नागरिकांना मनस्ताप

PMC website crash : पुणे महानगर पालिकेची वेबसाइट क्रॅश; मिळकत कर भरतांना नागरिकांना मनस्ताप

Jul 31, 2023, 01:22 PM IST

    • PMC website crash : मिळकत कर भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक आज करभरणा करत असल्याने आज पुणे महानगर पालिकेची साईट क्रॅश झाल्याने करभरणा प्रक्रिया ठप्प झाली आहे.
मिळकतकर भरण्यासाठी लागलेल्या नागरिकांच्या रांगा

PMC website crash : मिळकत कर भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक आज करभरणा करत असल्याने आज पुणे महानगर पालिकेची साईट क्रॅश झाल्याने करभरणा प्रक्रिया ठप्प झाली आहे.

    • PMC website crash : मिळकत कर भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक आज करभरणा करत असल्याने आज पुणे महानगर पालिकेची साईट क्रॅश झाल्याने करभरणा प्रक्रिया ठप्प झाली आहे.

पुणे : मिळकतकर भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे हजारो पुणेकर ऑनलाइन पद्धतीने कर भरणा करत असल्याने महानगर पालिकेची साईट क्रॅश झाली आहे. जे नागरिक पालिकेत प्रत्यक्ष येऊन कर भरत आहेत त्या ठिकाणी पुणे मनपाच्या मुख्य इमारतीतील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे महापालिकेचा सर्वर सह सर्व यंत्रणा ठप्प पडल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Jaipur express : डब्यात मृतदेह पडले होते; आरपीएफ जवान रिव्हॉल्व्हर घेऊन गाडीत फिरत होता, प्रत्यक्षदर्शीने सांगितली घटना

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना १५ मे ते ३१ जुलै या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये निवासी मिळकत करावर पाच ते दहा टक्के सूट देण्यात आलेली आहे. कर भरणा करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेने योजना देखील आणली होती. दरम्यान, गेल्या अडीच महिन्यात महापालिकेला सुमारे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळकत करातून मिळाले आहेत. दरम्यान, आज हा कर भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कर भरणा करण्यासाठी नागरिकांची गडबड सुरू आहे.

Go Back Mr Crime Minister: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याला युवक काँग्रेसकडून विरोध; पुण्यात पोस्टरबाजी

दरम्यान, नागरिकांनी आज सकाळ पासून ऑनलाइन कर भरणा करण्यास सुरुवात केली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात कर भरणा सुरू असल्याने महापालिकेच्या साईटवर याचा ताण आल्याने ही साईटच क्रॅश झाली आहे. यामुळे सकाळपासून व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची देखील तारांबळ उडाली आहे.

काही नागरिक प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयात जाऊन कर भरणा करण्यासाठी गेले होते. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने देखील नागरिकांना कर भरता आला नाही. मागील वर्षी देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. ऑनलाइन माध्यमातून तसेच क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुरुवातीला सुविधा केंद्र मध्ये जाऊन नागरिक कर भरत आहेत. सकाळी दहा वाजता क्षेत्रीय कार्यालय सुरू झाल्यानंतर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र एकाच वेळी अनेक नागरिक संकेतस्थळावर कर भरत असल्याने महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा कोलमडून गेली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या