मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune ganesh visarjan 2023: लवकर मिरवणुका संपवण्याचा पोलिसांचा दावा ठरला फोल; पुण्याची मिरवणूक लांबली

Pune ganesh visarjan 2023: लवकर मिरवणुका संपवण्याचा पोलिसांचा दावा ठरला फोल; पुण्याची मिरवणूक लांबली

Sep 29, 2023, 01:07 PM IST

    • Pune ganesh visarjan 2023: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक यंदा लवकर आटोपतील असा दावा पुणे पोलिसांनी केला होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. पुण्याची विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू असून मंडळे हळू हळू पुढे सरकत आहेत.
Pune ganesh visarjan 2023

Pune ganesh visarjan 2023: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक यंदा लवकर आटोपतील असा दावा पुणे पोलिसांनी केला होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. पुण्याची विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू असून मंडळे हळू हळू पुढे सरकत आहेत.

    • Pune ganesh visarjan 2023: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक यंदा लवकर आटोपतील असा दावा पुणे पोलिसांनी केला होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. पुण्याची विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू असून मंडळे हळू हळू पुढे सरकत आहेत.

पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पाडावी यासाठी पुणे पोलिसांनी मंडळांची बैठक घेत नियोजन केले होते. त्या नुसार दरवर्षी पहाटे निघणारा दगडूशेठ गणपती यावर्षी ४ वाजताच निघाला. या गणपतीचे विसर्जन ८ वाजता होऊन देखील इतर मंडळे रेंगाळल्याने दूसरा दिवस उजाडून ११ वाजले तरी पुण्यातील मिरवणूका या संथ गतीने पुढे जात आहेत. यामुळे लवकर विसर्जन मिरवणूक आटोपण्याचा पुणे पोलिसांचा दावा फोल ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाची वैभवी मिरवणूक; तब्बल २२ तासांनी झाले विसर्जन

पुण्यातील दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ठरल्याप्रमाणे साडेचार वाजता निघाली. या मिरवणुकीचे विसर्जन नऊ वाजण्याच्या आत झाले देखील. त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच  झाली नाही. दगडूशेठ गणपती पुढे जाऊनही ही मंडळे जागच्या जागी उभी होती. दरम्यान, इतर मंडळांना विसर्जन मिरवणुकीत पुढे पठवण्यात आले. मात्र, बाबू गेनू, अखिल भारतीय मंडई गणपतीच्या मिरवणूका १ नंतरही सुरू झालेल्या नव्हत्या. यानंतर अतिशय संथ गतीने या मिरवणुका पुढे जात होत्या. यामुळे इतर मंडळे मात्र, मिरवणुकीत पुढे जाण्यासाठी ताटकळली होती. दरम्यान, पुणे पोलिसांनी वारंवार बैठका घेऊन देखील इतर मोठ्या मंडळांनी साथ न दिल्यामुळे ही मिरवणूक रेंगाळली.

Maharashtra weather update: राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

या वर्षी मिरवणूक किती वेळ चालणार हा चर्चेचा विषय ठरला होता. दगडूशेठ मंडळाने ४ वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने इतर मंडळे काय भूमिका घेतात तसेच ते कोणत्या वेळेत आणि त्यांचे विसर्जन कधी होईल या कडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, दगडूशेठ लवकर जाऊन देखील अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच झाली नाही. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला. १२ वाजल्यानंतर डिजे बंद करण्यात आला. पारंपरिक वाद्य सुरू असले तरी ही मंडळे देखील हळू हळू पुढे जात होती. त्यामुळे ही मिरवणूक लांबली.

दरम्यान, पोलिसांनी अनेक मंडळांच्या बैठका घेतल्या. पोलिसांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्याने काही मंडळे नाराज झाली होती. तेव्हापासून मिरवणुकीचा मुद्दा चर्चेला आला होता. बैठकीत अनेक मंडलांनी लवकर मिरवणुका संपवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दगडूशेठ गेल्यावर देखील मंडळे ही संथ गतीने पुढे जात होती. या वर्षी तब्बल २ हजारहून अधिक गणेश मंडळे पुण्यात विसर्जन करणार होते.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या