मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह आठ पोलिसांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा

Pune: शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह आठ पोलिसांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा

Jul 07, 2022, 11:51 AM IST

    • पुण्यात शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आणि माजी नगरसेवकासह आठ पोलिसांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime (HT_PRINT)

पुण्यात शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आणि माजी नगरसेवकासह आठ पोलिसांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • पुण्यात शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आणि माजी नगरसेवकासह आठ पोलिसांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर(Shivsena Ex MAL), माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्यासह ८ पोलिस कर्मचाऱ्यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी तक्रार देण्यास गेल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद , गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे, गरुड, नदाफ, सुब्बानवाड, सुरेखा बडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मासे विक्रेत्याने न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर यांनी भारत बंद आहे तुझे मासे विक्रीचे दुकान बंद कर म्हणत दादागीरी करत शिवीगाळ केली होती. या प्रकरणी दाद मागण्यासाठी पोलिस स्थानकात गेलेल्या फिर्यादीला पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केली होती मारहाण होती. त्या दरम्यान हा प्रकार घडला होता. दरम्यान, न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. सामान्या नागरिकाला अशी वागणूक मिळत असेल तर ती यंत्रणा काय कामाची असे म्हणत न्यायालयाने या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या