मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : टोमॅटो वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी, ३ महिला जागीच ठार

Pune Accident : टोमॅटो वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी, ३ महिला जागीच ठार

Oct 13, 2022, 11:40 PM IST

    • दौंड तालुक्यात टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याकडेला पलटल्याने तीन महिलांचा जागीच ठार झाल्या तर पाच महिला गभीर जखमी झाल्या आहेत
टोमॅटो वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी

दौंड तालुक्यात टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याकडेला पलटल्याने तीन महिलांचा जागीच ठार झाल्या तर पाच महिला गभीर जखमी झाल्या आहेत

    • दौंड तालुक्यात टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याकडेला पलटल्याने तीन महिलांचा जागीच ठार झाल्या तर पाच महिला गभीर जखमी झाल्या आहेत

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याकडेला पलटल्याने तीन महिलांचा जागीच ठार झाल्या तर पाच महिला गभीर जखमी झाल्या आहेत. दौंडमधील रावणगावमध्ये सायंकाळी पाच वाजता हा अपघात झाला.ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. जखमींना दौंड व भिगवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊ पानसरे या दोन्ही सख्ख्या जावांसह अश्विनी प्रमोद आटोळे या तीन महिलांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसलेल्या महिला या ट्रॉलीखाली चिरडल्या गेल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टोमॅटोचे ७० ते ८० क्रेट होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या ३२ व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. त्यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. ट्रॉलीमध्ये नऊ महिला प्रवास करत होत्या. जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरखाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढले.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या