मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : कुरियरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत वाकड येथील संगणक अभियंत्याला २६ लाखांचा गंडा

Pune Crime : कुरियरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत वाकड येथील संगणक अभियंत्याला २६ लाखांचा गंडा

Dec 27, 2023, 01:31 PM IST

  • Pune Wakad cyber crime : पुण्यात सायबर गुन्हेगारीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. एका संगणक अभियंत्याला कुरियरमध्ये ड्रग्स असल्याचे सांगत तब्बल २६ लाख रुपयांची गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे.

Cyber fraud

Pune Wakad cyber crime : पुण्यात सायबर गुन्हेगारीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. एका संगणक अभियंत्याला कुरियरमध्ये ड्रग्स असल्याचे सांगत तब्बल २६ लाख रुपयांची गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे.

  • Pune Wakad cyber crime : पुण्यात सायबर गुन्हेगारीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. एका संगणक अभियंत्याला कुरियरमध्ये ड्रग्स असल्याचे सांगत तब्बल २६ लाख रुपयांची गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे.

Pune wakad cyber crime : पुण्यात सायबर गुन्हेगारीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. एका संगणक अभियंत्याला कुरियरमध्ये ड्रग्स असल्याचे सांगत तब्बल २६ लाख रुपयांची गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे. सायबर चोरट्यांनी तुम्ही पाठवलेल्या कुरियरमधून मुदत संपलेले पासपोर्ट, ड्रग्ज असल्याचे सांगत तसेच आधार नंबर बेकायदेशीर कामासाठी वापरला जात असल्याची भीती दाखवली. तसेच त्याच्याकडून बँक खात्याची माहिती घेत २६ लाख तुटण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

congress bharat nyay yatra : भारत जोडो नंतर आता काँग्रेसची भारत न्याय यात्रा; मणिपूर ते मुंबई ६,२०० किमीचा प्रवास

उदय प्रताप शंकर दयाल सिंह (वय ३१, रा. प्रिस्टीन प्रोलाईफ, वाकड) असे फसवणूक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुयार मोबाइल क्रमांकधारक राहुल देव, प्रदीप सावंत, पंजाब नॅशनल बँक आणि फेडरल बँकेचा खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karmala accident : साई दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! करमाळ्यात कंटेनर जीपच्या अपघातात ४ ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदयप्रताप हे संगणक अभियंता आहेत. २३ डिसेंबर रोजी आरोपी राहुल याने त्यांना मोबाइलवर फोनकरुन ते फेडएक्स कुरिअरमधून बोलत असल्याची बतावणी केली. तसेच सिंह यांच्या नावाने मुंबई ते तैवान असे कुरिअर जात असल्याची माहिती त्यांना दिली. त्यात पाच भारतीय व पाच तैवानचे मुदत संपलेले पासपोर्ट आणि पाच किलोग्रॅम कापड, काही क्रेडिट कार्ड आणि ९५० ग्रॅम ड्रग्स असल्याचे सांगितले. या बाबत त्यांना ऑनलाइन सायबर तक्रार देण्यास सांगितले. तसेच त्यांचा फोन दूसरा आरोपी प्रदीप याच्याकडे वळवण्यात आला.

आरोपी प्रदीपने सिंह यांना फोन करुन त्यांचा आधार नंबर हा चुकीच्या कामासाठी वापरत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावावर तब्बल ३६ ३६ बँक खाती असून त्याद्वारे मनी लॉड्रिंग होत असल्याचे देखील खोटे सांगितले. हे ऐकून उदयप्रताप हे घाबरले. याचा फायदा आरोपींनी घेतला. त्यांना पंजाब नॅशनल बँक तसेच फेडरल बँकेच्या खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून तब्बल २६ लाख ६ हजार रूपयांची त्यांना गंडवले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी थेट वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सायबर क्राइम अंतगर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या भुलथापांना बळी न पाडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या