मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasant More: रुपेश, सावध रहा नाहीतर...; मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी

Vasant More: रुपेश, सावध रहा नाहीतर...; मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी

Jun 17, 2022, 11:32 AM IST

    • मनसेचे नगर सेवक वंसत मोरे यांच्या मुलाला एका अज्ञाताने मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजन प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. मोरे यांचा मुलगा रुपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर चिठ्ठी ठेवत त्याला मारण्याची धमकी दिली आहे.
वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा रुपेश मोरे

मनसेचे नगर सेवक वंसत मोरे यांच्या मुलाला एका अज्ञाताने मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजन प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. मोरे यांचा मुलगा रुपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर चिठ्ठी ठेवत त्याला मारण्याची धमकी दिली आहे.

    • मनसेचे नगर सेवक वंसत मोरे यांच्या मुलाला एका अज्ञाताने मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजन प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. मोरे यांचा मुलगा रुपेश यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर चिठ्ठी ठेवत त्याला मारण्याची धमकी दिली आहे.

पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलगा रुपेश मोरे जीवे मारण्याची धमकी एका अज्ञाताने दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. एका अज्ञाताने रुपेशच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारीवर एक चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीत सावध रहा रुपेश अन्यथा असा मजकुर लिहिला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. रुपेश हे वसंत मोरे यांच्या सोबत या रोजगार मेळाव्याला हजर होते. त्यांनी त्यांची कार थोरवे शाळेच्या वाहनतळात उभी केली होती. यावेळी एकाने त्यांच्या गाडीवर एक चिठ्ठी लिहून ठेवली. रुपेश हे परत गाडीवर आल्यावर त्यांना त्यांच्या गाडीवर एक कागद दिसला. त्यांनी तो वाचला असता त्यात, ‘सावध रहा रुपेश, अन्यथा असा धमकीवजा मजकुर लिहिलेला आढळला. हा प्रकार गंभीर असल्याने वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

<p>धमकीचे पत्र&nbsp;</p>

वसंत मोरे हे मनसेचे नगरसेवक आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते नाराज आहे. यामुळे त्यांनी त्यांच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. दरम्यान त्यांना अनेक पक्षांनी आॅफर दिली आहे. यामुळे सातत्याने ते चर्चेत असतात. त्यांच्या मुलाला मिळालेल्या या धमकीपुळे पुण्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या