मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune crime : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह, सासुवर गुन्हा

Pune crime : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह, सासुवर गुन्हा

Sep 28, 2022, 05:24 PM IST

    • Pune crime news : पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहिनेते आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे क्राइम (HT_PRINT)

Pune crime news : पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहिनेते आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • Pune crime news : पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहिनेते आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दारु पिऊन सातत्याने पती मारहाण करत असल्याने या त्रासला कंटाळून विवाहितेने राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती आणि सासूवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Urulikanchan news : वीज पडल्याचा आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

माधुरी सुशांत वाघमारे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सुशांत वाघमारे, सासू प्रमिला वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलअ आहे. त्यांच्या विरोधात माधुरीचे वडील आनंदा लक्ष्मण कांबळे (वय ४७,रा.उत्तमनगर,पुणे) यांनी तक्रार दिली आहे. एप्रिल २०२२ मध्ये माधुरी हिचे सुशांत वाघमारे या तरुणासोबत चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर ती सासरी नांदत असताना, तिला पती वेळावेळी शिवीगाळ करुन मारहाण करत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारु पिऊन मारहाण करुन तसेच सासुने तिला घरातील स्वयंपाक येत नाही, वारंवार माहेरला जायचे नाही असे म्हणून तिचा मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून माधुरी हिने २/८/२०२२ रोजी नऊच्या सुमारास राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन खाली उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस तिचा पती व सासू जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तमनगर पोलीस याबाबत पुढील तपास करत आहे.

अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिषाने केले गरोदर

पुण्यात राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीस घरा जवळ राहणाऱ्या २३ वर्षीय मुलाने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिला १८ आठवडयांची गरोदर केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडित मुलीने वारजे पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी आरोपी सौरभ राजेंद्र मोते (वय २३, रा.वारजे,पुणे) याला अटक केली आहे. मार्च २०२२ पासून आतापर्यंत मुलीच्या आई वडील कामावर गेले असताना आणि घरी कोणी नसताना आरोपी मुलीच्या घरी येऊन मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे, असे बोलून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत तिला गरोदर केले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या