मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime : पुण्यात पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Nov 19, 2022, 07:10 PM IST

    • Pune Crime : पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे.
पुण्यात पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद

Pune Crime : पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे.

    • Pune Crime : पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दोन पेट्रोल पंपावर कोयत्याच्या साह्याने दहशत माजवून दरोडा टाकून तब्बल दीड लाख रुपये लुटणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना शिताफीने अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

करण युवराज पठारे (वय २०, रा. गुजरमळा, शिरूर, मुळ रा. रायगव्हाण, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर), रोहन सोमनाथ कांबळे (वय २०, रा. बोऱ्हाडेमळा, शिरूर), अजय जगन्नाथ माळी (वय २३, रा. माठ, नेहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर), अजय सोमनाथ लकारे वय २१, रा. माठ, इंदीरानगर, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

शिरूर तालुक्यातील पाषाणमळा येथील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन या इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड या पेट्रोलपंपावर शनिवारी (दि १२) वरील चौघांनी पेट्रोलपंपावरील कर्मचारी यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळून ४९ हजार ४०० रोख रक्कम व एक मोबाईल फोन जबरीने चोरून नेला होता. यानंतर दोनच दिवसांत मंगळवारी (दि १५) शिरूर तालुक्यातील न्हावरा गावच्या हद्दीत आयओका पेट्रोलीयम या एच.पी. कंपनीच्या पेट्रोलपंपावर सहा इसमांनी दुचाकीवरून येत तेथील कामगारांना कोयत्याने धाक दाखवून तब्बल १ लाख दोन हजार रोख रक्कम, मोबाईल फोन व पाकीट असा माल दरोडा टाकून लंपास केला होता. काही दिवसांत चार दिवसांच्या आतच दुसरा गुन्हा घडल्याने पोलीसांपुढे चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान होते.

या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः घटनास्थळावर भेट देऊन अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि सचिन काळे, पो.स. ई. गणेश जगदाळे, पो.स. ई. अमित सिद-पाटील, सहा. फौज तुषार पंदारे, पो. हवा. राजु मोमीन, पो. हवा. जनार्दन शेळके, पो. हवा. गुरू जाधव यांचे दोन पथके स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार या पथकाने सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त करून वरील चौघांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी न्हावरा येथील पेट्रोलपंपावरील गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच येथील शिवसाई फ्युअल स्टेशन या पेट्रोलपंपावरील गुन्हा उघडकीस आलेला आहे. अटक केलेल्या गुन्हेगारांकडून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेले चार कोयते जप्त करण्यात आले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या