मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gunaratna Sadavarte : 'पुण्यातील बंद बेकायदा; उदयनराजे, संभाजीराजेंना बेड्या ठोका'

Gunaratna Sadavarte : 'पुण्यातील बंद बेकायदा; उदयनराजे, संभाजीराजेंना बेड्या ठोका'

Dec 13, 2022, 03:12 PM IST

  • Gunaratna Sadavarte on Pune Bandh : पुण्यात आज पुकारण्यात आलेला बंद हा बेकायदा असून तो पुकारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Gunaratna Sadavarte - Udayanraje Bhosale

Gunaratna Sadavarte on Pune Bandh : पुण्यात आज पुकारण्यात आलेला बंद हा बेकायदा असून तो पुकारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

  • Gunaratna Sadavarte on Pune Bandh : पुण्यात आज पुकारण्यात आलेला बंद हा बेकायदा असून तो पुकारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Gunaratna Sadavarte on Pune Bandh : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं होत असलेल्या अपमानाचा निषेध म्हणून आज राजकीय पक्ष व शिवप्रेमी संघटनांनी पुणे बंद पुकारला आहे. या बंदला कडकडीत प्रतिसाद मिळत असतानाच बंदची हाक देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही मागणी केली आहे. 'भारत देश हा संविधानाच्या आधारे चालतो. बंद हे बेकायदेशीर आहेत असं खुद्द सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी सांगितलं आहे. असं असताना लोकांना वेठीस धरून बंद करणं, बंदच्या नावाखाली मोर्चा काढणं हे चुकीचं आहे, असं सदावर्ते यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितलं. 

'पुण्यातील बंदला जे कोणी जबाबदार असतील, मग ते विरोधी पक्षनेते अजित पवार असो, खासदार उदयनराजे भोसले असो किंवा मग माजी खासदार संभाजीराजे भोसले असो, त्या सर्वांवर कारवाई व्हायला हवी. बंद पुकारल्यामुळं हातावर पोट असलेल्या लोकांचं प्रचंड नुकसान होतं. त्यांच्या भाकरीवर गदा येते. याची दखल घेऊन न्यायालायनं यापूर्वी शिवसेनेला दंड ठोठावला आहे. त्यामुळं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाचीही वाट न पाहता या प्रकरणात कारवाई करावी आणि उदयनराजे व इतरांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या