मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: बेल्हा- जेजुरी महामार्गावर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, माय-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू

Pune: बेल्हा- जेजुरी महामार्गावर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, माय-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू

Feb 04, 2023, 10:37 AM IST

  • Pune Road Accident: पुण्यात बेल्हा जेजुरी महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी टेम्पो आणि दुचाकीत भीषण अपघात घडला, ज्यात माय-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Road Accident (HT)

Pune Road Accident: पुण्यात बेल्हा जेजुरी महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी टेम्पो आणि दुचाकीत भीषण अपघात घडला, ज्यात माय-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

  • Pune Road Accident: पुण्यात बेल्हा जेजुरी महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी टेम्पो आणि दुचाकीत भीषण अपघात घडला, ज्यात माय-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Truck-Bike Collision In Pune: पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरजवळ बेल्हा- जेजुरी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (३ फेब्रुवारी २०२३) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. शिक्रापूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

Mahayuti mumbai rally : महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

मिळालेल्या माहितीनुसार, विजया दिलीप डोके (वय, ४५), संकेत दिलीप डोके (वय, २०) आणि ओंकार सुक्रे (वय,२०) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी संकेत त्याची आई विजयाला नातेवाईकांच्या घरी पुजेच्या कार्यक्रमाला सोडण्यासाठी दुचाकीहून चालला होता. परंतु, येताना संकेतसोबत कोणी नसल्याने त्याने जिवलग मित्र ओंकार सुक्रे यालाही बरोबर घेतले. मात्र, धामारी येथे वळणावर शिक्रापूरच्या बाजूने आलेल्या एका टेम्पोची डोके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी संपत चंदर डोके यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने आंबेगाव तालुक्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे: बस-ट्रकच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर बुधवारी बस आणि ट्रकच्या धडकेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 20 जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील यवत गावाजवळ पहाटे ५ वाजता हा अपघात झाला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या