मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PSI exam result : ‘पीएसआय २०२०’ची तात्पुरती निवड यादी जाहीर, सुनील कचकड राज्यात प्रथम; ६५ पदांचा निकाल राखीव

PSI exam result : ‘पीएसआय २०२०’ची तात्पुरती निवड यादी जाहीर, सुनील कचकड राज्यात प्रथम; ६५ पदांचा निकाल राखीव

Jul 05, 2023, 06:57 AM IST

    • MPSC PSI 2020 result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली असून यात सुनील कचकड हा राज्यात प्रथम आला आहे.
Mpsc exam

MPSC PSI 2020 result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली असून यात सुनील कचकड हा राज्यात प्रथम आला आहे.

    • MPSC PSI 2020 result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली असून यात सुनील कचकड हा राज्यात प्रथम आला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेत सुनील कचकड याने बाजी मारली असून तो राज्यातून पहिला आहे. तर त्याच्या पाठोपाठ निर्मलकुमार भोसले यांनी दुसरा, तर गणेश जाधव यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेतील ६५ पदांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Chandrapur Crime : अल्पवयीन मुलीची छेड काढणे भोवले; पोलिसासह पाच जणांना अटक; चंद्रपूरातील घटना

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रक तसेच ट्विटर हॅन्डलवरुन ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल हा बऱ्याच दिवसांपासूंन रखडला होता. हा निकाल कधी लागणार याच्या प्रतीक्षेत मुले होती. अखेर दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय मागवण्यात आला आहे. त्यासाठी ११ जुलै ही अंतिम मुदत आयोगाने दिली आहे.

दरम्यान, राज्यातून पहिल्या येण्याचा मान हा सुनील कचकवाड याने मिळवला आहे. तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने मैदानावरील परीक्षेची तयारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली. जाहीर करण्यात आलेली निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे, प्रमाणपत्रांची पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशींमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या आरक्षणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक या प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या