मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim Accident : रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर खासगी आरामबस आदळली, ४ प्रवासी जागीच ठार तर १२ जखमी

Washim Accident : रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर खासगी आरामबस आदळली, ४ प्रवासी जागीच ठार तर १२ जखमी

May 09, 2023, 04:23 PM IST

  • Wasim accident : मालेगाव -मेहकर रस्त्यावर उभ्या ट्रकला खासगी बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Private bus and truck accident

Wasim accident : मालेगाव -मेहकर रस्त्यावर उभ्या ट्रकला खासगी बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Wasim accident : मालेगाव -मेहकर रस्त्यावर उभ्या ट्रकला खासगी बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

वाशिम जिल्ह्यात मालेगाव -मेहकर रस्त्यावर उभ्या ट्रकला खासगी बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात वडप गावाजवळ सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास झाला. 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

मिळालेल्या माहितीनुसार खासगी बस ( पीवाय-०५ ई १९५८) मालेगावमार्गे पुण्याकडे जात होती. वडपनजिक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर (आरजे ४७, जीए १८५०) आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, यात बसमधील चार प्रवासी ठार झाले, तर १२ जण गंभीर जखमी झाले. 

मंगेश शेषराव तिके (२५ वर्षे रा. वाघजाळी जि. वाशिम), अक्षय प्रभु चव्हाण (२३ वर्षे रा. साखरा जि. यवतमाळ), दिपक सुरेश शेवाळे (२७ वर्षे रा. गणेशपुर केनवड जि वाशिम) आणि अजय भारत शेलकर (२३ वर्षे रा. कडसा जि. यवतमाळ), अशी मृतांची नावे आहेत. 

अपघातानंतर काही मिनिटांत १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व जखमींना तातडीने मालेगाव रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना तात्काळ मदतकार्य सुरू केले. अपघातात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या