मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Election 2022 : महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण आदेश

BMC Election 2022 : महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण आदेश

Nov 25, 2022, 07:33 PM IST

  • Election Commission on Voter list : राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग

Election Commission on Voter list : राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Election Commission on Voter list : राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई – राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्याने आगामी महापालिका निवडणुकांची चाहुल लागली आहे. त्यातच आता राज्यात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांमध्ये तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्तीची मोहीम तातडीने राबवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयुक्त यू.पी.एस मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे निर्देश दिले.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मदान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी यू. पी एस मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत ही मोहीम राबवावी. एखाद्या मतदाराचा संपूर्ण पत्ता असूनही तो चुकीच्या सेक्शन ॲड्रेसमध्ये जोडण्यात आला असल्यास तो दुरूस्त करावा. शक्य असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार वेगळा सेक्शन ॲड्रेस तयार करावा असं त्यांनी म्हटलं.

तर या मोहीम काळात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी प्रत्येक यादी भागाचा बारकाईने आढावा घ्यावा.

 

पुढील बातम्या