मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “नरेंद्र मोदी पंतप्रधान असले तरी वागणूक एखाद्या दारूड्यासारखी..”, प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असले तरी वागणूक एखाद्या दारूड्यासारखी..”, प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

Sep 20, 2022, 09:28 PM IST

    • काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वागणूक दारुड्यासारखी  झाली आहे.  असे आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांची मोदींवर जहरी टीका

काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात असताना आतावंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीवागणूक दारुड्यासारखी झाली आहे. असे आंबेडकर म्हणाले.

    • काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वागणूक दारुड्यासारखी  झाली आहे.  असे आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar on Narendra Modi : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्षअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर देशातील संस्था विक्री करण्यावरून जोरदार निशाणा साधला. देशातील सरकारी मालमत्ता खुलेआम विकल्या जात आहेत. हे देशाच्या हिताचं नाही. सोप्या शब्दात सागांयचे तरदारुड्याला जर दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाहीत,तर तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वागणूक दारुड्यासारखी झाली आहे. हे मी दोन वर्षांपूर्वी बोललो होतो. रिझर्व्ह बँकेने त्याला आत्ता पुष्टी दिली आहे, अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकरयांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Panvel Rape: पॉर्न पाहून अल्पवयीन भावाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात!

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या अहवालाचा उल्लेख केला. रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने दोन महिन्यांपूर्वी सादर केलेला अहवाल सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटलंय.

काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर टीका करतानाच त्यांच्या वाढदिवशी सोडण्यात आलेल्या चित्त्यांवरूनही टोला लगावला.

 

नेहरूंनी त्यांच्या वाढदिवशी कबुतरं सोडली नाहीत -

दरम्यान, देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने होत असल्याचं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. सध्या देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. नेहरुंनी कबुतरं शांतीसाठी सोडली होती. पण नेहरूंनी त्यांच्या वाढदिवशी कबुतरं नाही सोडली. पण मोदींनी स्वत:चा वाढदिवस बघितला आणि चित्ता आणला. त्यातून सगळ्यांवर चित्ता सोडण्याची भीती दाखवली. आत्तापर्यंत ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स होता. आता चित्ता आहे. या दोन वेगवेगळ्या वृत्ती आहेत,असं आंबेडकर म्हणाले.

ईडीवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, कोण दोषी,कोण निर्दोष हे न्यायालयाला ठरवू द्या. तुम्हाला कुणाला पकडायचं असेल तर पकडा. पण २ महिन्यांत त्याचा एफआयआर कोर्टात गेला पाहिजे. कोर्टाला ठरवू द्या की तुम्ही केलेला तपास खरा आहे की खोटा. पण कोणत्याही सुनावणीशिवाय किंवा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय चार-पाच महिने एखाद्याला तुरुंगात ठेवणं,याला घटना मान्यता देत नाही.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या