मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani: परभणीच्या गंगाखेड येथील पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Parbhani: परभणीच्या गंगाखेड येथील पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Jun 20, 2023, 05:33 PM IST

  • Parbhani Suicide: परभणीच्या गंगाखेड येथील पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Representative use (HT_PRINT)

Parbhani Suicide: परभणीच्या गंगाखेड येथील पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

  • Parbhani Suicide: परभणीच्या गंगाखेड येथील पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Parbhani Police Suicide: परभणीच्या गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली? याचे कारण अद्यापही समोर आलेले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

प्रशांत दीपक असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. प्रशांत हे पूर्णा शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी आहेत. तसेच प्रशांत हे गेल्या बारा वर्षांपासून पोलीस दलामध्ये कार्यरत होते. दरम्यान, सोमवारी प्रशांत हे नियमितपणे आपले कर्तव्य बजावून सायंकाळच्या सुमारास घरी आले. मात्र, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजले तरी प्रशांत खोलीतून बाहेर आले नाही. यामुळे कुटुबियांनी त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता प्रशांत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच पूर्णा नदीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच प्रशांत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. प्रशांत यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. प्रशांत यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. प्रशांत यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या