मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Duplicate CM : तोतया मुख्यमंत्री विजय माने विरोधात गुन्हा दाखल, आपणच मुख्यमंत्री असल्याची बनवेगिरी !

Duplicate CM : तोतया मुख्यमंत्री विजय माने विरोधात गुन्हा दाखल, आपणच मुख्यमंत्री असल्याची बनवेगिरी !

Sep 19, 2022, 09:23 PM IST

    • तोतया सीएम विजय माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप माने याच्यावर करण्यात आला आहे.
तोतया मुख्यमंत्री विजय माने

तोतया सीएम विजय माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप माने याच्यावर करण्यात आला आहे.

    • तोतया सीएम विजय माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप माने याच्यावर करण्यात आला आहे.

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या सारखी वेशभुषा करून करून तसा फोटो सोशल माध्यमातून व्हायरल करणाऱ्या तोतयावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) असे तोतयागिरी करणाऱ्याचे नाव आहे.  त्याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून ते व्हायरल केले होते.  अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या इतरांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

याबाबत खंडणी व पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर भादंसं ४१९-५११,४६९,५००,५०१, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून तो सोशल मीडियामध्ये  व्हायरल केला आहे. तसेच समाजमाध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपण आहोत अशी तोतयागिरी करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअॅप व फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेत असताना पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. आरोपी विजय माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोशाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा अशा पद्धतीने वावरत होता.

आरोपीने जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी तोतयागिरी करुन ठकवण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या